Shirdi Sai Sansthan Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Sansthan : साई मंदिर सुरक्षेसाठी आता AI चा वापर; साई संस्थानला तातडीने मिळणार गुन्हेगारांचा अलर्ट, डेटा होणार संग्रहित

Shirdi News : AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. त्यानुसार साई संस्थानने या माध्यमातून सुरक्षा प्रणाली कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून गुन्हेगारांची ओळख पटवून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अलर्ट मिळणार

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : तंत्रज्ञानाच्या युगात आता AI प्रणालीचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या प्रणालीचा वापर करण्यात येत असून शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने AI चा वापर करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून लवकरच हि प्रणाली अमलात येणार आहे.

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांची संख्या मोठी असून देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. यामुळे येथे भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात होत असते. यामुळे शिर्डीच्या साईबाबा संस्थांकडून सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतात. अशातच आता AI तंत्रज्ञानाचा वापर करत पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. 

गुन्हेगारांचा डेटा प्रणालीत केला जाणार संग्रहित

साईबाबा संस्थानने AI तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन "पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन" प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या प्रणालीत संग्रहित केला जाणार असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच सीसीटीव्हीच्या आधारे साई संस्थानला तातडीने अलर्ट मिळणार आहे. 

भाविकाच्या देणगीतून प्रणाली 

एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन AI प्रणाली संस्थानने कार्यान्वित केली आहे. साईभक्तांच्या सुकर दर्शनासह मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रणाली अंत्यंत महत्वाची ठरणार आहे. अर्थात ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची या प्रणालीमुळे खैर राहणार नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT