Jamner News
Jamner NewsSaam tv

Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon Jamner News : सासरी पत्नीला घ्यायला गेला असता सासरच्या मंडळींसोबत जोरदार भांडण झाले. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपविली आहे.
Published on

जळगाव : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहिता आत्महत्या करत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र पत्नीसह सासू, सासरे व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामधील कुंभारी बुद्रुक येथील बादल हवसू मंडाळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान बादल मंडाळे याची पत्नी रुपाली गरोदर असल्याने ती लपाली येथे माहेरी होती. यामुळे ८ सप्टेंबरला बादल याने माहेरी असलेल्या पत्नी रूपाली हिला घेऊन येतो, असे त्याच्या भाच्याला सांगून गेला होता. मात्र दुपारी तीनच्या सुमारास श्रीराम जोशी यांना बादल याने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे फोनवरून समजले. त्यावरून बादलच्या नातेवाइकांनी लपाली येथे धाव घेतली. 

Jamner News
Akkalkuwa : युरियाची टंचाई, पीक नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

सासरच्या मंडळींचा त्रास 

दरम्यान बादल व त्याची पत्नी रूपाली तसेच सासरा संजय जयराम भवर, सासू लिलाबाई संजय भवर, शालक अक्षय संजय भवर (सर्व रा. लपाली) यांच्यात जोरदार वाद झाला होता. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून बादल याने विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

Jamner News
Bhujbal Bridge : वाकडच्या भुजबळ चौक उड्डाण पुलावर दुचाकीस बंदी; वाहतूक विभागाकडून वेळ निश्चित

सासरच्यांवर गुन्हा दाखल 

दरम्यान सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासातून तरुणाने आत्महत्या केल्यावरून इंदूबाई चिंधू मुके (रा. कुंभारी बुद्रुक, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धामणगाव बडे पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com