Loni Police : पोलिसाकडून दुकानदाराला मारहाण; दुकान बंद करण्यावरून झाला वाद

Ahilyanagar News : दुकान बंद करण्यावरून दुकानदार व पोलीस कर्मचारी यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. यात पोलीस कर्मचाऱ्याने दुकानदाराला मारहाण केली असून घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद
Loni Police
Loni PoliceSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

लोणी (अहिल्यानगर) : राहाता तालुक्यातील कोल्हार गावात रात्री दुकान बंद करण्याच्या नावाखाली पोलिसाने दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून मारहाण प्रकरणी दुकानदार पोलिसात तक्रार देण्यासाठी गेला असता पोलिस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोप दुकानदार कैलास पिलगर यांनी केला.

अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार गावात रात्री दहा वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. दरम्यान रात्री दहा वाजेला सर्व आस्थापना बंद करण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्वसामान्य दुकानदार देखील रात्री दहा वाजले कि आपली दुकाने बंद करत असतात. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास कैलास पिलगर यांना दुकान बंद करण्यास थोडा उशीर झाला होता. 

Loni Police
Bhujbal Bridge : वाकडच्या भुजबळ चौक उड्डाण पुलावर दुचाकीस बंदी; वाहतूक विभागाकडून वेळ निश्चित

शाब्दिक वादानंतर मारहाण 

मंगळवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान केक शाॅप सुरू असल्याने सिव्हिल ड्रेसवर असलेला एक पोलीस त्याठिकाणी आला. यावेळी इतरांनाही दुकाने बंद करायला लावा; असं म्हटल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचं दुकानदार पिलगर यांनी म्हटले आहे. मारहाणीची ही घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तर मारहाण झाल्यानंतर दुकानदार पिलगर हे लोणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले. मात्र पोलिस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कैलास पिलगर यांनी केला आहे

Loni Police
Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

चिखलीत तुफान राडा 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील बाबू लॉज चौकात रात्री दोन गटात झालेल्या तुफान राडा झाला होता. या प्रकरणी चिखली पोलिसाने २० आरोपीसह ४० ते ५० लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केली आहेत. तर सध्या बाबू लॉज चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटाची समजूत काढली. सध्या चौकात शांतीपूर्ण वातावरण असून परिस्थीती पूर्वपदावर आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com