Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News : साई मंदिरातील फुल, हार, प्रसाद बंदी उठवली; भाविकांसाठी नवीन नियमावली लागू, प्रवेशद्वारावर लागणार बिल पावती

Shirdi News : भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्वाच्या मंदिरांना हाय अलर्ट देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना साई मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) :  भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना साई मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र परिस्थिती सामान्य होऊनही ही बंदी कायम असल्याने बंदी उठणार कधी? अशा आशयाची बातमी साम टिव्हीने चार दिवसांपूर्वी प्रसारित केली होती. यानंतर अखेर आज ही बंदी उठवण्यात आल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्वाच्या मंदिरांना हाय अलर्ट देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना साईबाबा मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून तपासणी करत फुल, हार, प्रसाद मंदिराच्या प्रवेशद्वारावरच जमा करून घेतला जात होता. मात्र युद्धजन्य परिस्थिती निवारल्यानंतर अर्थात परिस्थिती सामान्य होऊन अनेक दिवस उलटले. तरीही साई मंदिरात बंदी कायम होती. 

सामच्या बातमीनंतर बंदी मागे 

दरम्यान चार दिवसांपूर्वीच साम टिव्हीने साई मंदिराच्या प्रवेशद्वारावरून आढावा घेत साईभक्तांच्या भावना जाणून घेत ही बंदी उठणार कधी? असा सवाल उपस्थित करत बातमी प्रसारित करण्यात आली होती. अखेर ही बंदी आजपासून उठवण्यात आली असून साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मंदिर संस्थानने बंदी उठविली असली तरी काही नियमावली लावण्यात आली आहे. 


फुल - प्रसाद मंदिरात नेण्यासाठी नवीन नियमावली
दरम्यान फुल, हार, प्रसाद मंदिरात नेण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी या संदर्भात काही नवीन नियमावली करण्यात आली आहे. साई संस्थान एम्लपॉइज क्रेडिट सोसायटी मार्फत फुल, हार, प्रसाद विक्री सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांना रितसर बिल पावती देऊन फुल, प्रसाद देण्यात येतो. ही पावती मंदिराच्या प्रवेशद्वारावर दाखवली; तरच भाविकांना पूजेचे सामान मंदिरात नेता येणार आहे. ज्या भाविकांकडे पावती नसेल त्यांना मज्जाव केला जातो. खाजगी दुकानदारांचे दर निश्चित नसल्याने ते भाविकांना कुठलीही पावती देत नाही. त्यामुळे बाहेरील खाजगी दुकानदारांकडून फुल, हार, प्रसाद विकत घेणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी खाजगी फुल, प्रसाद विक्रेत्यांसाठी प्रशासनामार्फत नवीन नियमावली तयार केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "तुझा रेट काय आहे?"; भर कार्यक्रमात प्रसिद्ध गायिकेला प्रश्न, तिने चप्पलेने दिला प्रसाद, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्यामुळे श्री संत गजानन महाराज दर्शन वेळेत बदल

Hairbrush Cleaning Tips: केसांचा ब्रश स्वच्छ कसा करायचा?

Kolhapur Accident: रस्त्यालगच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO

Gold Rate Today: सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वाढले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे भाव

SCROLL FOR NEXT