Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi : शिर्डीत संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचे होणार उत्पादन; डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन

Shirdi News : आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साजेसा महत्वाचा प्रकल्प शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये ग्लोबल फोर्ज कंपनीच्या माध्यमातून संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचे उत्पादन होणार

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहिल्यानगर)
: साईबाबांच्या शिर्डीत आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचे उत्पादन होणार आहे. यासाठीच्या शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साजेसा महत्वाचा प्रकल्प शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येत आहे. ग्लोबल फोर्ज कंपनीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक बॉम्ब शेल्सचे उत्पादन या प्रकल्पातून होणार आहे. इथे उत्पादित होणारे बॉम्ब शेल्स भारतीय संरक्षक व्यवस्थेसह मित्र राष्ट्रांना पुरवले जाणार आहेत. 

हजारो तरुणांना मिळणार रोजगार 
साईबाबांच्या पावन भूमीत हा प्रकल्प सुरू होत असल्याचा आनंद आहे. डिफेन्स क्लस्टरसह शिर्डी एमआयडीसीत टाटा उद्योग समूहाचा एक प्रकल्प देखील सुरू होत आहे. हा प्रकल्प उभा राहत असल्याने शिर्डी एमआयडीसीमध्ये परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळात शिर्डीचा चेहरामोहरा बदलेला दिसेल असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.

डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन
शिर्डी एमआयडीसीमध्ये उभारण्यात येत असलेल्या बॉम्ब शेल्सचे उत्पादनाकरिता डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन आज करण्यात आले. दरम्यान येणाऱ्या काळात भारत हा जगाला मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य पुरवणारा देश बनेल असा विश्वास ग्लोबल फोर्ज कंपनीचे संस्थापक गणेश निबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT