Nashik : शेततळ्यात अंघोळीसाठी गेले; दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, येवला तालुक्यातील घटना

Nashik News : शाळेला सुटी असल्याने गावात एकाच ठिकाणी राहणारे व नेहमी सोबत राहणारे साई कुमावत व शुभम मोरे हे दोघेजण सकाळी अंघोळ करण्यासाठी जवळच असलेल्या शेततळ्यावर गेले होते
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 
येवला (नाशिक)
: सकाळी शेततळ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील सावखेड येथे असलेल्या शेततळ्यात हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत मुलांच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.  

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सावखेड येथील साई संदीप कुमावत व शुभम शांताराम गोरे (वय १२) असे घटनेत मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. शाळेला सुटी असल्याने गावात एकाच ठिकाणी राहणारे व नेहमी सोबत राहणारे साई कुमावत व शुभम मोरे हे दोघेजण सकाळी अंघोळ करण्यासाठी जवळच असलेल्या शेततळ्यावर गेले होते. शेततळ्यातील पाण्यात उडी मारली मात्र ते दोघेही बाहेर येऊ शकले नाही. 

Nashik News
Buldhana Crime : पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचे कारण आले समोर; अनैतिक संबंधातून गावातील व्यक्तीकडूनच सुपारी

आई- वडिलांचा एकच आक्रोश 

दरम्यान घटनेची माहिती गावात समजल्यानंतर गावकरी शेततळ्याच्या दिशेने धावत गेले. यानंतर गावातील पोहणार्यांनी शेततळ्यात उतरून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. मुलांचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेची पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. घटनेने गावात शोककळा पसरली. 

Nashik News
Railway crime : प्रवासादरम्यान एक्सप्रेसमध्ये चोरी; चोरट्याला ताब्यात घेत पाच लाखांचे मोबाईलसह दागिने हस्तगत

भुजबळांनी घेतली कुटुंबीयांची भेट 

येवला तालुक्यातील सावखेडा येथील दोन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला उपजिल्हा रुग्णालयात मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले. तसेच मतदार संघातील शेततळ्यांमध्ये पुन्हा अशा घटना होऊ नये; यासाठी शेततळ्यांना संरक्षक जाळी बसविण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com