Shirdi International Airport News Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Airport: शिर्डीकरांचे स्वप्न होणार साकार, विमानतळाचा विस्ताराला सरकारकडून मिळाली मान्यता

साम टिव्ही ब्युरो

Shirdi International Airport News:

एक मोठी बातमी समोर आली आहे. साईनगरी शिर्डी येथील विमानतळाचा अधिकचा विस्तार करण्यासोबतच नवीन इमारत उभारणी आणि अन्य विकास कामांना आज राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे शिर्डी विमानतळाचा महाविस्तार होणार असून त्यानिमित्ताने समस्त साई भक्तांसह अवघ्या शिर्डीकरांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील (Mumbai) सह्याद्री अतिथिगृह येथे आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांसोबतच शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांना मंत्रिमंडळ बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.   (Latest Marathi News)

यामध्ये दर्जेदार टर्मिनल उभारणी, अँप्रानचे विस्तारीकरण व इतर कामांसाठी ८७६ कोटी २५ लाख व उर्वरित कामाकरिता रुपये ४९० कोटी ७४ लाख खर्चास कार्योत्तर मान्यता देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही सर्व विकास कामे केली जाणार आहेत.

यामध्ये भुसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सर्वेक्षण व माती परिक्षण, धावपट्टीचे विस्तारीकरण आदी तांत्रिक कामांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात समस्त साई भक्तांसह अवघ्या शिर्डीकरांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देता येणार आहेत, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT