Shirdi News saam tv
महाराष्ट्र

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

Shirdi News : शिर्डीमध्ये दहीहंडीच्या मिरवणुकीदरम्यान एका तरुणाची हत्या करण्यात आली. जुन्या वादातून या तरुणाला त्याच्याच मित्रांनी संपवले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Yash Shirke

  • शिर्डीत दहीहंडीच्या मिरवणुकीदरम्यान तरुणाची हत्या.

  • पोलिसांनी तरुणाच्या मित्रांना ठोकल्या बेड्या.

  • घटनेने शिर्डीत मोठी खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु.

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

शिर्डीत जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल (१६ ऑगस्ट) रात्री शहरातील दहीहंडी मिरवणुकीनंतर दोन तरुणांनी त्यांच्याच ओळखीतल्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. सानूकुमार ठाकूर (वय १८ वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून या हत्येप्रकरणी शिर्डी पोलिसांनी साई कुमावत आणि शुभम गायकवाड या दोन्ही आरोपींना तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

सानुकूमार ठाकुर आणि आरोपी साई कुमावत, शुभम गायकवाड हे तिघेही मित्र होते. काल दहीहंडी उत्सवाची मजा घेत असताना सानूकुमार याने फोन करून दोघांनाही एका हॉटेलसमोर बोलावले. तिथे मयत आणि आरोपींमध्ये अगोदर शिवीगाळ आणि नंतर शाब्दीक बाचाबाची झाली. आरोपी साई आणि शुभमने सानुकूमार याला लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकूने सपासप वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रात्री बारा वाजेच्या सुमारास हि घटना घडली.

गंभीर जखमी झालेल्या सोनुकूमारला उपचारासाठी जवळच्या साईबाबा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आज (१७ ऑगस्ट) घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

मयताचे वडील नवीनकुमार बालबोध ठाकूर यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.. काही महिन्यांपूर्वी शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली होती. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कारवायांचा धडका लावला होता. मात्र काल रात्री झालेल्या तरुणाच्या हत्येने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाच्या सरी; नवी मुंबईसह ठाणे, डोंबिवलीत पाऊस

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

SCROLL FOR NEXT