Shirdi Crime News Saam TV
महाराष्ट्र

Shirdi News: साईबाबांच्या शिर्डीत गुंडगिरी वाढली, भररस्त्यात तरुणावर तलवारीने हल्ला; घटनेचा VIDEO व्हायरल

Shirdi Breaking News: सोमवारी (१९ फेब्रुवारी) शिर्डीत तिघांनी एका तरुणावर तलवार तसेच चॉपरने हल्ला चढवला. थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Satish Daud

Shirdi Crime News Today

मागील काही दिवसांपासून राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्या शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात. त्या शिर्डीत देखील गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. सोमवारी (१९ फेब्रुवारी) शिर्डीत तिघांनी एका तरुणावर तलवार तसेच चॉपरने हल्ला चढवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धक्कादायक बाब म्हणजे, साईमंदिरच्या ४ नंबर प्रवेशद्वारासमोरील भर बाजारात हा प्रकार घडला. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सूर्यकांत शशिकांत वाणी (वय २४) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी निखिल महादेव सोनवणे , आर्यन राजकुमार पाटील , प्रदीप सुनील सोनवणे याला अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास सूर्यकांत हा साईमंदिरच्या ४ नंबर प्रवेशद्वारासमोरील बाजारपेठेत उभा होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी वाद घालत सूर्यकांतवर तलवार तसेच चॉपरने हल्ला केला.

आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, हातात तलवार घेऊन बाजार पेठेतून पळणाऱ्या आरोपींचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे.पोलिसांनी तातडीने तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दहशत माजवणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. अगदी दोनच दिवसांपूर्वी एका चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT