Shirdi Airport Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Airport: शिर्डी विमानतळ जप्त होणार? ग्रामपंचायतीची विमानतळाला नोटीस; काय आहे प्रकरण?

Special News: शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोटींची थकबाकी आहे. अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दरबारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुली होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत.

Girish Nikam

कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन शिर्डी संस्थान सतत चर्चेत असतंच. आता शिर्डी विमानतळ प्रशासनाचा कारभारही वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. कारण शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस बजावण्यात आलीय. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोटींची थकबाकी आहे.

अनेकदा नोटीस बजावूनही कर न भरल्यानं वसुलीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीनं ही नोटीस बजावण्यात आलीय. 2016 पासूनची थकबाकी असल्यानं ग्रामविकासावर अंकुश आलाय. अगदी गल्ली ते दिल्ली पर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करुनही कोणी दाद देत नसल्यानं सरपंच, उपसरपंच आक्रमक झाले आहेत.

काकडी ग्रामपंचायतीनं 1500 एकर जागा विमानतळासाठी दिली आहे. विमानतळ प्रशासनाकडून अनेक आश्वासन देण्यात आली होती. मात्र ती हवेतच विरली असा ग्रामपंचायतीचा आरोप आहे. येत्या पाच दिवसात ठोस निर्णय झाला नाही तर टर्मिनल बिल्डींग, पेट्रोलपंप, एटीसी टाॅवरसह सर्व मालमत्ता जप्त करू, अशी नोटीस बजावण्यात आलीय.

केवळ देशच नाही तर जगभरातून शिर्डीमध्ये पर्यटक आणि व्हिआयपींचा राबता असतो. त्यासाठी हे विमानतळ खूप महत्वाचं आहे. काकडीच्या ग्रामस्थांनी आता या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडेही धाव घेतली आहे. राज्य सरकार तोडगा काढणार का? विमानतळ जप्तीची नामुष्की टळणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT