Shrirampur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Ahilyanagar news : महायुतीकडून दोघांनी उमेदवारी दाखल केल्याने माघारीच्या दिवशी एका उमेदवाराची माघार होईल; अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी अजीत पवार गटाकडुन विद्यमान आमदार लहू कानडे यांना तर शिवसेना शिंदे गटाकडुन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पक्षाने एबी फॉर्म दिले होते. दरम्यान काल दोनही उमेदवारांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला.

श्रीरामपूर (Shrirampur) विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देत एबी फॉर्म दिला होता. त्या पाठोपाठ काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेल्या विद्यमान आमदार लहू कानडे यांना देखील अजित पवार गटाने उमेदवारी देत एबी फॉर्म दिला. यामुळे महायुतीकडून (Mahayuti) दोघांनी उमेदवारी दाखल केल्याने माघारीच्या दिवशी एका उमेदवाराची माघार होईल; अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र माघारीच्या दिवशी शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे हे दिवसभर नॉट रिचेबल झाले. त्यामुळे महायुतीकडून (Shiv Sena) शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन्ही उमेदवारी कर्ज कायम राहिले. भाऊसाहेब कांबळे हे माध्यमांसमोर येत मीच महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला. माघारीसाठी मला माझ्या वरिष्ठांचा कोणताही फोन आला नाही त्यामुळे माझा प्रचार मी सुरू केला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दुसरीकडे काँग्रेसमधून उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांनी देखील मीच महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे. अजित दादांनी माझ्या प्रवेशाच्या दिवशीच मला एबी फॉर्म दिला होता. वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील लहू कानडे यांनी दिली. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी देखील नॉट रिचेबल झालेल्या शिंदे गटाच्या भाऊसाहेब कांबळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान या सगळ्या गोंधळावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, कि गैरसमजुतीमुळे शिंदे गटाच्या भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज राहिला आहे. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करून महायुतीचा उमेदवार कोण? याचा निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले आहे. श्रीरामपूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हेमंत ओगले मैदानात आहेत. मात्र महायुतीत कांबळे आणि कानडे हे दोघेही अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करत असल्याने वरिष्ठ पातळीवरून श्रीरामपूरचा हा पेच सोडवला जातो का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT