Shinde Sena Shinde Group Leader Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई

Shinde Sena Shinde Group Leader Arrest: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला बीडमधून अटक करण्यात आली. १० वर्षांपासून फरार असलेल्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबू सुब्रमण्यम कांबळतला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.

Priya More

Summary -

  • शिंदेसेना शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांकडून अटक

  • १० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या

  • २०१६ च्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी

  • न्यायालयाकडून २ दिवसांची पोलिस कोठडी

योगेश काशिद, बीड

बीडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदेगटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. गेल्या १० वर्षांपासून फरार असलेल्या शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाला बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटकेनंतर पोलिसांनी त्याला आष्टी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबू सुब्रमण्यम कांबळतला पोलिसांनी अखेर अटक केली. अंभोरा पोलिसांनी अटकेची ही कारवाई केली. २०१६ मध्ये आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील पवन ऊर्जा प्रकल्पावर काम करणाऱ्या मजूर अनिल म्हस्के यांच्यावर १२ जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात बाबू सुब्रमण्यम कांबळत हा मुख्य आरोपी होता. या हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते.

बाबू सुब्रमण्यम कांबळतने केलेल्या हल्ल्यात अनिल म्हस्के गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कांबळत फरार झाला होता. मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून कांबळतला बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील ११ आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली होती. आष्टी न्यायालयाने बाबू सुब्रमण्यम कांबळतला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या अटकेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बाबू सुब्रमण्यम कांबळत फरार असताना देखील त्याची राजकीय कारकीर्द सुरूच होती. फरार असताना देखील तो शिंदेसेनेचा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. बाबू सुब्रमण्यम कांबळत हा अनेक प्रचारसभांमध्ये दिसला होता. आरोपी सगळीकडे खुलेआम फिरत होता तरी देखील पोलिस त्याला अटक करत नव्हते त्यामुळे त्याला राजकीय वरदहस्त होता की काय? अशी चर्चा सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरच्या औराद शहाजनीत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

काल एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, आज आमदार उघडपणे बोलला; मित्रपक्षांना थेट ताकद दाखवली

Vastu Shatra: घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर घरात येते नकारात्मकता; कसा दूर कराल दोष?

Numerology: सावधान! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी घातक आहे एप्रिलचा महिना

Ashok Kharat Case: मोठी बातमी! अशोक खरातचे सगळे कारनामे समोर येणार? SIT ने पुन्हा घेतला ताबा

SCROLL FOR NEXT