Shivsena Viral Uddhav Thackeray Video saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Shivsena Viral Uddhav Thackeray Video: शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचा एका जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे 'जय गुजरात' म्हणत असल्याचे दिसते आहे.

Bharat Jadhav

पुण्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' नारा दिल्यानंतर ठाकरे गटाकडून टीका केली जातेय. राज्यात हिंदी आणि मराठी वाद सुरू असतानाच राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत 'जय गुजरातचा नारा दिल्यानं शिंदे टीकेच धनी बनले. उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जातेय. आता शिंदे गटाकडून विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं जातंय.

जय गुजरात नाऱ्यावरून आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदें गटात जुंपलीय. ठाकरे गटाच्या टीकेनंतर आता शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून उद्धव ठाकरेंचा एका जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यात उद्धव ठाकरे हे 'जय गुजरात' म्हणत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने या व्हिडिओला एक टीका करणारं कॅप्शन दिलंय. ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ असं कॅप्शन देत शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.

जय गुजरातच्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीय. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसे राहू शकतात? असा सवाल त्यांनी केलाय. पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत, शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी 'जय हिंद, जय महाराष्ट्र' , जय गुजरात म्हणत भाषण संपवलं. त्यावरून त्यांच्यावर टीका होतेय.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंवर टीका केली. केम छो एकनाथ साहेब', असं म्हणत आव्हाडांनी शिंदेंना डिवचलंय.एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणेनंतर मनसे नेते मनोज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, 'आज महाराष्ट्रात खरी लाचारी काय असते, ते पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री जर फक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खुश करण्यासाठी जय गुजरात म्हणत आहेत, अशी टीका मनसे नेते मनोज चव्हाण यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं डिंभे धरण ओव्हरफ्लो

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह आला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT