Omraje Nimbalkar Residence supporters clash news 
महाराष्ट्र

शिवसेना खासदाराच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, Video Viral

Omraje Nimbalkar Residence supporters clash news: शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. प्रताप सरनाईक यांच्या भेटीदरम्यान सुरू झालेला वाद बाचाबाचीनंतर हाणामारीत बदलला.

Bharat Jadhav

  • खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक

  • बाचाबाचीचं रूपांतर पुढे हाणामारीत झाल्याचं समोर आलं आहे

शिंदे गट शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकराच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी तुंबळ हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थित असतानाचा कार्यकर्ते एकमेंकांना भिडले. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली त्यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. परंतु कार्यकर्त्यांमध्ये वाद कशामुळे झाले याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी तत्काळ मध्यस्ती करत वाद मिटविला.

धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे यांचे राजकारणात लॉन्चिंग?

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांचे राजकारणात लॉन्चिंग चालू केलं असल्याचं प्रत्यय आज गोवर्धनवाडी या ओमराजे यांच्या गावात आला आहे.कालच जयराजे निंबाळकर यांचा वाढदिवस होता त्यातच आज पालकमंत्री प्रताप सरनाईक हे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरी स्नेह भोजनासाठी आले होते यासाठी खासदार ओमराजे निंबाळकरांनी मोठी शक्ती लावत कार्यकर्ते जमत त्यांचं शाही स्वागत केलं.

यातून खासदार ओमराजे निंबाळकर हे आपला लहान बंधू जयराजे निंबाळकर यांचे राजकीय लॉन्चिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कालच राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेर व आसपासच्या परिसरात भावी आमदार म्हणून बॅनर लागले होते त्यातच हा कार्यक्रम झाल्याने ही राजकीय लॉन्चिंग असल्याची चर्चा रंगू लागली आहे.विशेष म्हणजे या वाढदिवसा निमित्त लावलेल्या बॅनरवर जयराजे निंबाळकर भावी आमदार तुळजापूर असा उल्लेख असुन यावर ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचा देखील फोटो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली, विजय वडेट्टीवार 'डाव' उलटवण्याच्या तयारीत; राजकारणात खळबळ

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी होणार, राज्यातील शाळांमध्ये दप्तरमुक्ती अभियान

निशूच्या वडिलांचा हल्लेखोर मोकाटच, गुन्ह्याची जाहीर कबुली, पोलिसांची लक्तरं वेशीला

नर्सेस बनल्या चिमुकल्यांसाठी 'देवदूत', रुग्णालयातील भीषण आगीतून 9 बालकं बचावली

राज्यात रिक्षा-टॅक्सींचा मीटर घोटाळा, इलेक्ट्रॉनिक चिपच्या मदतीनं प्रवाशांची लूट

SCROLL FOR NEXT