Raigad Politics: Shinde Sena-ncp Dispute Erupts Again; Tatkare-dalvi Clash saam tv
महाराष्ट्र

Shivsena Vs NCP: सरोगसी बाळ ते अकलेचे तारे...शिंदेसेना-राष्ट्रवादी वाद उफाळला; रायगडच्या राजकारणाला पुन्हा फोडणी

Raigad Politics : रायगडमध्ये शिंदेसेना आणि अजित पवार गटातील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अनिकेत तटकरे आणि महेंद्र दळवी यांच्यातील वादामुळे रायगडच्या राजकारणात पुन्हा वातावरण तापलं आहे.

Bharat Jadhav

  • रायगडमध्ये शिंदेसेना आणि अजित पवार गटातील राजकीय वाद

  • अनिकेत तटकरे आणि महेंद्र दळवी यांच्यातील राजकीय संघर्ष

  • रायगडच्या राजकारणात शिंदेसेना राष्ट्रवादी वाद पुन्हा उफाळला

सचिन कदम, साम प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद मिटला असला तरी दोन्ही पक्षातील वैमनस्य अजून मिटलं नाहीये. पालकमंत्रिपदामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या संबंधात कडूपणा आला होता. परंतु या दोन्ही पक्षामधील वादाचा दुसरा अंक आता सुरू झाल्याचं दिसत आहे. आता हा वाद आमदार अनिकेत तटकरे आणि शिवसेना नेते महेंद्र दळवी यांच्यात सुरू झालाय.

जवळपास दीड दोन वर्षांपासून पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले आणि सुनिल तटकरे यांच्यातील वाद सुरू होता. या वादावर मागील आठवड्यात पदडा पडला खरा, पण दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष कमी झाला नाहीये. अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ असल्याचा उल्लेख करत शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरेंच्या आकलन टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

काही दिवसापूर्वी आमदार अनिकेत तटकरे यांनी काही दिवसापूर्वी महेंद्र दळवी यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अकलेची आणि त्यांच्या आकलन शक्तीची कीव येते. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी खासदार सुनिल तटकरे यांची मदत घेतलीय. मात्र आज तेच तटकरे साहेबांवर टीका करत आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत मदतीसाठी कितीवेळा तटकरे साहेबांकडे दळवी यांनी फेऱ्या मारल्या? काय काय केलं? हे सगळं माहिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दळवींनी त्यांची पत्नी मानसी दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे, यासाठी तटकरे साहेबांकडे दिल्लीवाऱ्या केल्या असल्याचे सांगत आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींची पोलखोल केली होती.

अनिकेत तटकरे यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ आहेत. कारण जर आम्ही फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही जिंकलो असतो, अनिकेत तटकरे यांचा राजकिय जन्म झालाच नसता. त्याचमुळे आमच्याविषयी अनिकेत तटकरे यांनी आकलेचे तारे तोडू नयेत, असा सल्ला दळवी यांनी त्यांना दिलाय. दळवी यांच्या या जहरी टिकेनंतर रायगडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा राजकिय वाद पेटण्याची चिन्ह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

Puran Poli Recipe : पहिल्याच प्रयत्नात बनवा मऊसूत पुरणपोळी; गणपतीला दाखवा नैवेद्य, चव चाखतच राहाल!

Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

Maharashtra News Live Update: धाराशिव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा राडा

India Fort : डोंगरावर नाही, चक्क सपाट जमिनीवर उभा आहे 'हा' अभेद्य किल्ला, तुम्ही कधी पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT