akola politics Saam tv
महाराष्ट्र

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

akola politics : अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेची मदतीसाठी प्रकाश आंबेडकरांना हाक. वंचितचे उमेदवार नसलेल्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला मदतीचा प्रस्ताव. आंबेडकरांशी चर्चेसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि मंत्री संजय राठोड अकोल्यात तळ ठोकून

Vishal Gangurde

अकोल्यात मोठी राजकीय घडामोड

शिंदे गटाने मागितला प्रकाश आंबेडकरांकडे मदतीचा हात

शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू असल्याची माहिती

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला महापालिकेत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला मदतीची साद घातली आहे. अकोल्यात 'वंचित'चे उमेदवार नसलेल्या जागांवर वंचितला मागितला मदतीचा हात मागितला आहे. वंचितची मतं शिंदे सेनेला देण्याची शिंदेच्या शिवसेनेने वंचितला विनंती केली. शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकरांशी मंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा सुरू आहे. शहराबाहेरच्या एका अज्ञात ठिकाणी प्रकाश आंबेडकर आणि मंत्री संजय राठोड यांच्यात बैठक आणि मदतीच्या फॉर्मुल्यावर चर्चा सुरू आहे.

अकोल्यात शिंदेंची शिवसेना 80 पैकी 72 जागांवर लढत आहे. तर वंचित 54 जागांवर लढतेय. ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी खेळली. या बैठकीत आंबेडकरांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळतेय.

दोन्ही पक्षांमधील चर्चा सुरू असल्याचा ठोस पुरावा 'साम'च्या हाती लागलाय. संजय राठोडांनी अशी चर्चा सुरू असल्याला दुजोरा दिलाय. अकोल्यात वंचितसोबत होत असलेल्या चर्चेसाठी संजय राठोड यांच्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवही तळ ठोकून आहेत. अकोल्यात निवडणुकीच्या आधी ही चर्चा यशस्वी झाली तर निवडणुकीवर मोठा फरक पडणार आहे. अकोला आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो. अकोल्यात आंबेडकरांच्या वंचितची निर्णायक ताकद मानली जाते.

संजय राठोड फोनवर काय म्हणाले?

"नमस्कार मी संजय राठोड बोलतोय. अकोल्यात आपली प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महत्वाची चर्चा होणार आहे. या चर्चेला किती वेळ लागणार हे माहित नाही. अकोला महापालिकेसाठी मी प्रभारी आहे. समाजाने शिवसेनेच्या पाठिशी रहावे. शिंदे साहेबांनी आपल्याला विकासासाठी 750 कोटी रूपये दिलेत. त्यांनी अनेक योजना दिल्यात. तुम्ही शिवसेनेला मदत करा, असे संजय राठोड म्हणाले.

तत्पूर्वी, मंत्री प्रतापराव जाधव असलेल्या हॉटेलमध्ये वंचितचे नेते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रतापराव जाधवांची भेट घेतल्याची माहिती हाती आली आहे. पुंडकर भेट करून निघताना 'साम'च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

अदानींचं विमानतळ, भरकटलेलं राजकारण अदानींचं साम्राज्य वाढण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT