Santosh Bangar
Santosh Bangar Saam tv
महाराष्ट्र

Santosh Bangar: अंधारे यांना बहीण मानतो; कळमनुरीत उमेदवार घोषित केल्यानंतर बांगर नेमकं काय म्हणाले?

संदिप नागरे

Santosh Banger on Sushma Andhare:

शिवसेनेत फूट पडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाच्या विरोधात रणनीतीही आखायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट कळमनुरी विधानसभा मतदारसंघात संतोष बांगर यांच्या विरोधात उमेदवार घोषित केला आहे. यानंतर शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी पहिली प्रतिक्रिया देत सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)

कळमनुरी विधानसभा मतदारसंघ असलेल्या बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. याकार्यक्रमादरम्यान, संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संतोष बांगर म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत साडे तीन लाख मतदानापैकी अंधारे यांना साडे चारशे मते पडले. त्यांनी माझ्या मतदार संघात कितीही सभा घेतल्या तरी फरक पडणार नाही'.

'सुषमा अंधारे या हिंदू देवी-देवतांचे अपमान करतात. त्यांना लोकांनी तीन महिने घरातून बाहेर निघू दिले नव्हते. शिवसेनेचा धमाका काय असतो हे फक्त संतोष बांगर यांनी दाखवले आहे. कळमनुरी मतदारसंघात नाव नसताना मी आमदार झालो. याला धमाका म्हणतात, अशा शब्दात संतोष बांगर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.

'मी सुषमा अंधारे यांना बहीण मानतो, त्यांनी हिंदू धर्मातील देवदेवतांचे अपमान करू नये. ईश्वर त्यांना सुदबुद्धी देवो. मला उद्धव ठाकरे यांना सांगायचे आहे की, सुषमा अंधारे यांच्या सारख्या लोकांमुळे तुमचा पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत खालून एक क्रमाकांवर आला आहे, अशी टीका बांगर यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murud-Janjira Fort : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; 26 मेपासून जंजिरा किल्ला बंद

Special Report | लोकसभा निवडणूक दिग्गजांचं करिअर घडणार की बिघडणार?

Nagpur RTE News | RTE मधून शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी तयार केली बनावट कागपत्र

Today's Marathi News Live : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल

Ramayana Movie : 'रामायण' चित्रपटाचे किती भाग प्रदर्शित होणार ?, दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT