Naresh Mhaske Attacks Ganesh Naik Saam
महाराष्ट्र

'तुमचे VIDEO थिएटरमध्ये लावू'; भाजपच्या बड्या नेत्याला थेट इशारा, शिंदे गटाचे खासदार आक्रमक, नेमकं कारण काय?

Naresh Mhaske Attacks Ganesh Naik: गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका करत हल्लाबोल केला होता. शिंदे गटातील खासदार नरेश म्हस्केंनी नाईकांवर गंभीर आरोप केले.

Bhagyashree Kamble

  • महायुतीतील वाद चिघळला.

  • गणेश नाईकांची शिंदेंवर टीका.

  • म्हस्केंचा नाईकांना थेट इशारा.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. महायुतीत जोरदार आरोप - प्रत्यारोप सुरू आहे. नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अलिकडेच विकास कामांच्या मुद्यावरून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीकेचे बाण सोडले होते. यानंतर शिंदे गट नाईकांविरूद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नाईकांचे नालायकपणाचे व्हिडिओ सिनेमागृहात लावणार, असा थेट इशारा शिंदे गटानं दिलाय.

एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून गणेश नाईकांनी ठाण्यात मोर्चेबांधणीला सुरूवात केलीये. नवी मुंबई आणि ठाण्यात नाईकांचा डोळा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. गणेश नाईकांचं नवी मुंबईत वर्चस्व आहेच. शिंदेंची ताकद असणाऱ्या ठाण्यात नाईकांमार्फत भाजपकडून ताकद वाढवण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आलंय. त्यामुळे भाजप अन् शिंदेंची शिवसेना यांच्यातील मतभेदाची चर्चा ठाण्यात होतेय.

नवी मुंबईत शनिवारी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत म्हस्केंनी नाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. 'आमच्या नेत्यांना नालायक म्हणणारे गणेश नाईक हेच प्रत्यक्षात नालायकपणाची व्याख्या आहेत. त्यांचे नालायकपणाचे व्हिडिओ आधी नवी मुंबईत व्हायरल झाले होते. नंतर समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले. आता हेच व्हिडिओ राज्यातील चित्रपटगृहांत दाखवू', असा थेट इशारा खासदार नरेश म्हस्केंनी दिला.

'राज्यात महायुतीचे सरकार आहे. तरीही गणेश नाईक वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करीत आहेत. दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत', असं नरेश म्हस्के म्हणाले. 'यापुढे अशा प्रकारची वक्तव्ये केल्यास सर्वसामान्य शिवसैनिकसुद्धा तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देईल', असा इशाराही यावेळी नरेश म्हस्केंनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जास्त वेळ बसून राहिल्याने तुमच्या शरीरावर होतात 'हे' घातक परिणाम

Satish Shah Last Rites: सतीश शाह यांना अग्नी देताना कलाकार मित्रांनी गायलं 'हे' गाणं; कारण सांगत म्हणाले...

Tomato Eating Tips : सावधान! टोमॅटो खाताना 'ही' एक चूक करणं पडेल महागात

Mumbai To Toranmal: महाराष्ट्रातील दुसरे थंड हवेचे ठिकाण, मुंबईहून तोरणमाळला कसे जायचे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग

महिला डॉक्टरला न्याय न मिळाल्यास ८३ वर्षांचे माजी आमदार काठीच्या आधारावर बीड ते फलटण पायी जाणार|VIDEO

SCROLL FOR NEXT