महामार्गावर भीषण अपघाताचा थरार! कंटनेरची ट्रकला धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू

Mathura Highway Crash: मथुरा - दिल्ली महामार्गावरील रूनकता फ्लायओव्हरवर भीषण अपघात. कंटेनरची - ट्रकला धडक. ४ जणांचा जागीच मृत्यू.
Mathura Highway Crash
Mathura Highway Crashsaam
Published On
Summary
  • मथुरा - दिल्ली महामार्गावर भीषण अपघात.

  • कंटेनरची - ट्रकला जोरदार धडक.

  • ४ जणांचा जागीच मृत्यू.

  • पोलिसांकडून तपास सुरू.

मथुरा - दिल्ली महामार्गावरील रूनकता फ्लायओव्हरवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. कंटेनर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळ उडाला होता. बराच वेळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्देवी घटना उघडकीस आली. मथुरा - दिल्ली महामार्गावर हा भीषण अपघात घडला. रूनकता फ्लायओव्हरवर कंटेनर आग्र्याहून मथुरेच्या दिशेनं जात होती. कंटेनरच्या समोरून ट्रक येत होते. कंटेनरची ट्रकला जोरदार धडक बसली. यानंतर काही काळ महामार्गावर गोंधळ उडाला.

Mathura Highway Crash
कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरूणीला गुंडानं अडवलं, प्राणघातक हल्ला केला अन्.. पुढे काय घडलं?

या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची पटली आहे. विजेंद्र सिंग असे कंटेनर चालकाचे नाव आहे. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील होता. पत्नी रीमा ठाकूर यांचाही या अपघातात मृत्यू झाला. यासह एका मुलाचा आणि एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

Mathura Highway Crash
हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्र दिवाळीआधी? भाजप मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

अपघातानंतर महामार्गावर गोंधळ उडाला होता. तसेच बराच वेळ वाहतूक कोंडी उडाली होती. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली. तसेच पोलिसांना या भीषण अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com