Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: नवेगाव-नागझिराचं पर्यटन वाढवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचं मोठं पाऊल; वनमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Bhandara News: व्याघ्र प्रकल्पातील संतुलन राखण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूरवरून आणलेल्या दोन वाघिणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले.

Vishal Gangurde

शुभम देशमुख

navegaon nagzira tiger reserve News: वन विभागाने राज्यामध्ये पहिल्यांदाच एक अभिनव प्रयोग केला आहे. व्याघ्र प्रकल्पातील संतुलन राखण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूरवरून आणलेल्या दोन वाघिणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले.

यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडाले आणि वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या दोन वाघिणींमुळे या क्षेत्रातील वाघांची संख्या बारा वरून आता 14 वर पोहोचली आहे. (Latest Marathi News)

नवेगाव-नागझिरा या राखीव व्याघ्र अभयारण्यात बारा वाघांची संख्या होती. यामध्ये वाघिणींची संख्या कमी असल्याने वाघांमध्ये होत असलेला संघर्ष टाळण्यासाठी आणि या क्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने तसेच चंद्रपूरमध्ये वाढलेल्या वाघांचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने राज्यात पहिल्यांदाच हा अभिनव प्रयोग करण्यात आला.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून अडीच ते तीन वर्षाची एक एक वाघीण पकडून तिला शनिवारी नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने वनविभागाने जय्यत तयारी केली होती. जिथे या वाघिणीला सोडणार होते, त्या ठिकाणी जाळी आणि हिरव्या जाळीने कुंपण केले होते.

तसेच देखरेखी साठी मच्यान लावण्यात आले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः या कार्यक्रमासाठी नागझिरा येथे उपस्थित होते. वाघिणीला सोडल्यानंतर मुनगंटीवार यांनी या वाघिणीचे सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला.

जगात १९३ देश आहेत या पैकी केवळ १४ देशात वाघ आहेत. या 14 देशांपैकी सर्वात जास्त वाघ हे भारतात आहे. ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत. त्यापैकी सर्वात जास्त हे विदर्भात आहेत हे विदर्भाचे वैशिष्ट आहे. नागझीराचा पर्यटन वाढावा या साठी दोन वाघिणी सोडण्याचा निर्णय घेतला.

नागझिरा कोर क्षेत्र ६५३ स्क्वेअर किलो मीटर आहे. तर बफर १२४१ स्क्वेअर किलो मिटर एवढं असल्याने आणि २० वाघ अधिवास करतील एवढी क्षमता असल्याने आता २ वाघिणी सोडण्यात आल्या असून पुढे ३ वाघ पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT