shinde-Fadnavis Government  saam tv
महाराष्ट्र

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; 'या' वर्गातील उमेदवारांचा शासकीय सेवेतील नियुक्तीचा मार्ग मोकळा

नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shinde Government News : नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोकरभरतीवरील निर्बंध , कोविड- १९, लॉकडाऊन व न्यायालयीन प्रक्रिया या कारणांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा निवड मंडळे व निवड प्राधिकरणे यांच्याकडून निवड होऊनही शासकीय सेवेत नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांसाठी शिंदे सरकारने मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील या निर्णयामुळे सदर उमदेवारांचा शासकीय सेवेतील नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, एसईबीसीमधून ईडब्ल्यूएसमध्ये विकल्प दिलेल्या व ज्यांची निवड दिनांक ९ सप्टेंबर २०२० पूर्वी झाली होती, अशा उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देऊन निवड प्रक्रिया व उमेदवारांच्या वैध शिफारशीनुसार नियुक्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांवरील अंतिम निकालाच्या अधीन राहून ही नियुक्ती असणार आहे.

या कालावधीमधील उमेदवारांना होणार लाभ

शिंदे सरकारच्या या निर्णयाचा लाभ २०१४ ते ९.९.२०२० या कालावधीमध्ये निवड झालेल्या एसईबीसी उमेदवारांना मिळणार आहे. सदर एसईबीसी उमेदवारांना अनुज्ञेय करण्यात आलेला ईडब्ल्यूएस विकल्प ग्राहय धरल्यानंतर पूर्ण करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेमधील नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना मिळणार आहे.

उमेदवारांची नियुक्ती का रखडली होती ?

मराठा आरक्षण (Reservation) कायदा, २०१८ या कायदयास सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरीम स्थगिती दिली व ५ मे २०२१ रोजी कायदा रद्द केला.

ईएसबीसी कायदा, २०१४ व एसईबीसी कायदा, २०१८ अन्वये निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी, नोकरभरतीवरील निर्बंध, कोविड- १९, लॉकडाऊन व न्यायालयीन प्रक्रिया या कारणांमुळे उमेदवारांची निवड होऊन देखील त्याना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली नव्हती.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी ईएसबीसी / एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा (आर्थिकदृष्टया दुर्बल घटक) लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून ईडब्ल्यूएस किंवा अराखीव प्रवर्गाचा विकल्प मागविण्यात आला. एसईबीसीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी अराखीव किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा विकल्प दिल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा निवड मंडळे व निवड प्राधिकरणे यांनी निवड याद्या सुधारीत केल्या. अशा सुधारीत निवड याद्यांमधील उमेदवारांची ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड झालेली आहे.

दरम्यान, नोकरभरतीवरील निर्बंध, कोविड- १९, लॉकडाऊन व न्यायालयीन प्रक्रिया या कारणामुळे नियुक्ती देण्यात आली नाही अशा उमेदवारांना "महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती अधिनियम २०२२" मधील तरतुदीनुसार नियुक्ती देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

SCROLL FOR NEXT