Shimga 2026 Special Ferry Service Saam Tv
महाराष्ट्र

Shimga 2026: गुड न्यूज! शिमग्यासाठी कोकणात बोटीने जा, मुंबई ते विजयदुर्ग फक्त ७ तासांत; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Shimga 2026 Special Ferry Service: कोकणामध्ये शिमग्यासाठी आता तुम्हाला बोटीने देखील जाता येणार आहे. फडणवीस सरकारने शिमग्याआधी मोठी घोषणा केली. मुंबई ते विजयदुर्ग प्रवास फक्त ७ तासांत करता येणार आहे.

Priya More

Summary -

  • शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज

  • विशेष फेरी सेवा सुरू करण्यात आली

  • मुंबईतील भाऊचा धक्का येथून विजयदुर्गपर्यंत फेरीने प्रवास करता येणआर

  • ही सेवा 1 मार्चपासून सुरू होणार असून एकूण 6 दिवस फेरी धावणार आहे

शिमग्यासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिमग्याआधी कोकणी माणसासाठी फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली. शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गर्दी लक्षात घेता फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. कोकणामध्ये शिमग्यासाठी आता बोटीने जाता येणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोकणामध्ये शिमग्यासाठी आता बोटीने जाता येणार आहे. मुंबईवरून अवघ्या ७ तासांमध्ये तुम्हाला विजयदुर्गला पोहचता येणार आहे. १ मार्चपासून समुद्री मार्गे तळकोकणात जाता येणार आहे. एम टू एम फेरीचे वेळापत्रक मंत्री नितेश राणे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतल्या भाऊचा धक्क्यावरून विजयदुर्गपर्यंत फेरीने प्रवास करता येणार आहे. नितेश राणेही पहिल्या दिवशी बोटीने प्रवास करणार आहेत.

असे असेल वेळापत्रक -

- १ मार्च -

भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

- २ मार्च -

विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

- ४ मार्च -

भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

- ५ मार्च -

विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

- ७ मार्च -

भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

- ८ मार्च -

विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT