Shruti Vilas Kadam
फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. या ऋतूला वेगळा आनंदोत्सव रंग होळीमुळे आहे.
फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत कोकणात शिमगोत्सव साजरा केला जातो.
होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात.
बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात.
शिमग्याच्या सणाला गावातील प्रत्येक घरात ग्रामदेवतेची पालखी नेण्यात येते.
शिमगा हा फाल्गुन महिन्यात येतो. हा काळ कोकणतील शेतकऱ्यांसाठी निवांत काळ असतो.
याच काळात शेताची भाजवणी करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवलेले जाते म्हणून या सणाला शिमगा पूर्वीच्या काळातील लोक बोलायचे.
कोकणात शिमगा किंवा शिशिरोत्सव हा अगदी उत्साहात साजरा केला जातो.