pandit patil  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यातील आणखी एक राजकीय घराणं फुटलं, जयंत पाटील यांचा सख्खा भाऊ भाजपमध्ये जाणार

pandit patil News : राज्यातील आणखी एक राजकीय घराणं फुटलं आहे. जयंत पाटील यांचा सख्खा भाऊ भाजपमध्ये जाणार आहे. यामुळे रायगडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Vishal Gangurde

राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील आणखी एक राजकीय घराणं फुटलं आहे. भाजपने शेकापला मोठा धक्का दिला आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांचा सख्खा भाऊ माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी आमदार पंडित पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. पंडित पाटील यांच्या पक्ष प्रवेशावर त्यांचे भाऊ जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंडित पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याने फरक पडत नाही, मतदार शेकापसोबतच राहतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांच्या प्रतिक्रियेमुळे पंडित पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे समजत आहे.

शेकापचे माजी आमदार आणि शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील बुधवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पंडित पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे पक्षाला काहीच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. मी उद्या पक्ष सोडला तरीही मतदार शेकापसोबत राहतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

'पंडित पाटील हे याआधीच भाजपमध्ये गेले असल्याचा उपहासात्मक टोला त्यांनी यावेळी लगावला. काही चुका आमच्याकडून झाल्या, त्याची कबुली देताना शेकापच्या पराभवाचे खापर जयंत पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर फोडले.

कोण आहेत पंडित पाटील?

शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी विधानसभेत अलिबागकरांचं नेतृत्व केलं आहे. गेल्या दहा वर्षांत पंडित पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मागील काही वर्षांत पंडित पाटील आणि शेकापमध्ये धुसफूस पाहायला मिळाली. विधानसभा निवणुकीदरम्यान अलिबागच्या उमेदवारीवरूनही शेकापमध्ये धुसफूस होती. यावरून पंडित पाटील नाराज होते. दुसरीकडे जंयत पाटील यांचे भाचे अॅड आस्वाद पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: राज्यात थंडी गायब, पाऊस हजर! हवामान विभागाचा नोव्हेंबरसाठी अंदाज काय? VIDEO

Maharashtra Live News Update: इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचे प्रक्षेपण

Tara Sutaria: लाल इश्क...; तारा सुतारियाचा बनारसी साडीतील रॉयल लूक

India vs Australia Hobart T20I: वॉशिंग्टनची अति 'सुंदर' खेळी; टी२०मालिकेत १-१ ने बरोबरी

ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT