SHEGAON GAJANAN MAHARAJ SANSTHAN DONATES RS 1.11 CRORE FOR DROUGHT-HIT FARMERS saam tv
महाराष्ट्र

दुष्काळाच्या संकटात बळीराजासाठी देवस्थान धावून आलं; थेट १ कोटी ११ लाखांची मदत

Shegaon Gajanan Maharaj Sansthan Rs 1.11 crore: शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ कोटी ११ लाखांची मदत करण्यात आली असून, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शेगावच्या प्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थानने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार देण्यासाठी संस्थानच्या वतीने तब्बल १ कोटी ११ लाखांचा सढळ हाताने निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे.

यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने दीर्घकालीन ओढ दिली, ज्यामुळे अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव या विश्वस्त संस्थेने मदतीचा मोठा हात पुढे केला आहे. राज्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांसाठी संस्थानच्या वतीने १ कोटी ११ लाखांचा सहयोग निधी थेट मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला आहे.

हा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृतरीत्या सुपूर्द करण्यात आला आहे. आपत्तीच्या काळात मदतीचा हात देण्याची श्री गजानन महाराज संस्थानची जुनी परंपरा आहे. यापूर्वी देखील राज्यावर किंवा देशावर आलेल्या विविध संकटांच्या काळात संस्थानने सढळ हाताने मदत केली आहे. यंदाच्या दुष्काळात शासनाच्या खांद्याला हात लावत संस्थानने दिलेली ही कोट्यवधी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. संस्थानच्या या सामाजिक व मानवीय भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT