Palghar Shark Attack Fisherman  Saam TV
महाराष्ट्र

Shark Attack: मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर शार्क माशाचा हल्ला; पायाचा तुकडाच पाडला, धक्कादायक VIDEO

Palghar Shark Attack: नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर अचानक शार्क माशाने हल्ला चढवला. 200 किलोहून अधिक वजनाच्या माशाने थेट तरुणाच्या पायाचा लचकाच तोडला.

Satish Daud

Palghar Shark Attack Fisherman

नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर अचानक शार्क माशाने हल्ला चढवला. 200 किलोहून अधिक वजनाच्या माशाने थेट तरुणाच्या पायाचा लचकाच तोडला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. थरकाप उडवणारी ही घटना पालघर तालुक्यातील वैतरणा खाडीत घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विकी गोवारी (वय ३२) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मिळालेल्या माहितीनुसार, मनोर येथील सायलेंट हॉटेल जवळील वैतरणा खाडीत मंगळवारी (१३ फेब्रुवारी) विकी हा मासेमारी करण्यासाठी गेला होता.

खाडीतील पाण्यात मासेमारी करीत असताना अचानक शार्क माशाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्यात विकीचा पाय जवळपास एक-दीड फूट कुरतडला गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला. (Latest Marathi News)

त्याच्यासोबत इतर तरुणांनी जीवाची बाजी लावत त्याची शार्क माशाच्या तावडीतून सुटका केली. तसेच त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, शार्क माशाने हल्ला केल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

अनेकांनी मनोर येथील सायलेंट हॉटेलजवळ गर्दी केली. मंगळवारी समुद्राला उधाण असून याच उधानाच्या पाण्यासोबत हा महाकाय मासा या नदीपात्रात आला होता. उधानाचे पाणी कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास हा मासा मृत अवस्थेत आढळून आला. या माशाला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

SCROLL FOR NEXT