Sharad Pawar  Saam Digital
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'लेक राज्याचा पहिला मुख्यमंत्री झाला अन् आईला माहीतही नाही...'; शरद पवारांनी सांगितला यशवंतराव चव्हाणांचा खास किस्सा!

Sharad Pawar On Yashwantrao Chavan : यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि कराडला आईला भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या आईला आपला मुलका नक्की कोण झाला आहे हे ही माहिती नव्हतं, आज शरज पवारांनी तो किस्सा सांगितला.

Sandeep Gawade

यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलं आहे. त्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा कराडला आले होते. कराड त्यांचं मूळ गाव..इथे त्यांची आई राहात होती. त्यांना भेटण्यासाठी एकदा ते कराडला आले होते. मात्र त्यांच्या आईला आपला मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणजे नक्की कोण झाला, हे माहिती नव्हतं. मामलेदार झाला का काय झाला, असं त्या म्हणाल्या, इतक्या साध्या घरातीलं ही माणसं होती, आज त्यांच्या आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला.

...तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी माफी मागितली

यशवंत चव्हाण यांचा लोकशाही आणि संसदीय पद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. त्यामुळे मला आनंद आहे, ही संसद अशी आहे, की सुंसावाद साधण्याची संधी मिळत असते. असंही शरद पवार म्हणाले. एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत मी होतो त्यावेळी एस.एम. जोशी काही प्रश्न विचारत होते. त्यांना एक मंत्री उत्तर देत होते ते उत्तर एस. एम. जोशी यांना पटत नव्हतं, त्यांना तीन वेळा उत्तर दिल्यानंतर त्या मंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितलं की मी तीन वेळा उत्तर दिले यांच्या डोक्यात जात नाही. तेव्हा यशवंत चव्हाण यांनी सभागृहाची माफी मागितली आणि म्हंटलं या सभागृहात असं बोलता कामा नये.

महात्मा फुलेंच्या विचारांमध्ये आधुनिकता होती

वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या लोकांना एक व्यासपीठ मिळायला हवं अशी त्यांची भावना होती. आणि त्यामुळं राज्यव्यापी विचारमंथन व निर्धार परिषद सुरू केली. आमचा प्रयत्न हाच आहे सरकार कोणाचे असो पण राष्ट्रभाषा टिकायला हवी. लोकांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचायला हवेत. महात्मा फुलेंनी जो विचार मांडला त्याचा प्रचार कसा होईल याचा विचार व्हायला हवा. महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारात आधुनिकता होती. त्यांनी महिलांचे शिक्षण हा आधुनिकतेचा विचार केला त्यात सावित्रीबाईंचं योगदान विसरता काम नये. मी नेहमी सांगतो हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा आहे.

देशातल्या सर्वात मोठ्या धरणाचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता

जसं महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं. तसं संविधानाच्या निर्मितीत डॉ आंबेडकरांचं योगदान मोठं आहे. मी १० वर्ष कृषीमंत्री होतो. शेतीचा दुसरा प्रश्न वीज आणि पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, देशातील सर्वात मोठं धरण पंजाब हरियाणामध्ये आहे. या धरणाचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता. ते तिथेच थांबले नाही धरणाच्या पाण्याने वीज कशी निर्माण करता येईल, याचा विचार केला. या एवढ्या विजेला एका भागातून दुसऱ्या भागात कसे न्यायचे यासाथी महामंडळाची स्थापना केली बाबासाहेबांचं आधुनिकतेचं विचार होता.

या देशात कामगारांचे कायदे नव्हते त्या कायद्याचे मुद्दे स्वातंत्र्याआधी बाबासाहेबांनी उपस्थित केले. अशाच कामात जबाबदारीने स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून तुम्ही करत आहात आणि त्यामागे चव्हाण सेंटर तुमच्या मागे उभे आहे. मांडलेले प्रश्नांची नोट माझ्यासामोर आहे.शेतकऱ्याच्या घामाची किंमत त्यांना चांगली मिळायला हवी, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT