ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

nanded : नांदेड शहरात गोळीबाराची घटना घडली. दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद झाला. एकाचा गोळी झाडून खून. प्रेम प्रकरणातून हत्या घडल्याची सूत्रांची माहिती
Nanded news
Nanded Saam tv
Published On
Summary

नांदेड शहरात गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आलंय

नांदेडमध्ये दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद झाला, त्यानंतर एकाची हत्या झाली

प्रेम प्रकरणातून हत्या घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड शहरात आज गुरुवारी सायंकाळी गोळीबाराचा थरार घडला. दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद होऊन एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना गंज भागातील पहेलवान टी हाऊसच्या माघे ही घटना घडली.

25 वर्षीय सक्षम ताटे याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आरोपी हिमेश मामीडवार आणि अन्य एकाने त्याला गोळी झाडली. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Nanded news
BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

सक्षम ताटे आणि हिमेश मामीडवार हे दोघेही मित्र असून दोघेही गुन्हेगार आहेत. दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दीड महिन्यापूर्वीच सक्षम ताटे जामिनावर सुटला होता. दोंघावर देखील एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. आज सायंकाळी सक्षम ताटे पहेलवान टी हाऊसच्या पाठीमागे गल्लीत बसला होता. तिथे हिमेश मामीडवार आपल्या सहकार्यांसोबत आला.

Nanded news
Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

सक्षमच्या छातीत त्याने गोळी झाडली. त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला. दरम्यान सक्षम ताटे हा हिमेश मामीडवार याच्या बहिणीशी बोलत होता. दोघात प्रेम संबंध होते. त्यातून हिमेश याने सक्षम याची हत्या केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दोन आरोपींना इतर पोलिसांनी ताब्यात घेतले . हत्येचे नेमके कारण काय, आणि या घटनेत एकूण किती आरोपी होते. त्याचा तपास कितवारा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com