Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

MLA Ashish Deshmukh Threat To Oppositions: स्थानिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना धमकी दिलीय. त्यांच्या धमकीच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झालाय.
MLA Ashish Deshmukh Threat To Oppositions
MLA Ashish Deshmukh during a local election campaign where his reported warning to the opposition sparked controversy.saam tv
Published On
Summary
  • कळमेश्वरच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदारानं दिली धमकी

  • नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना विरोधकांना धमकी दिली.

  • काही दिवसापूर्वी भाजप उमेदवाराला मारहाण झाली होती.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र निवडणुकांच्या काळात महाराष्ट्राचा बिहार झालाय. उमेदावारांचे अपहरण होतंय तर कुठे उमेदवारांवर हल्ले होत आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राम खाडेंवर प्राणघातक झाल्याची घटना सकाळी घडली. आता नागपूर मधील भाजप आमदार आशिष देशमुख कापून काढण्याची भाषा केलीय.

MLA Ashish Deshmukh Threat To Oppositions
Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात भूकंप होणार; राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या युतीची नांदी

कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना घड धमकी दिलीय. हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळं जास्त कराल तर कापून काढू अशी धमकी त्यांनी दिलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मात्र भाजप आमदारानं थेट कापून काढण्याची धमकी दिलीय. विशेष म्हणजे मंचावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थिती होते.

MLA Ashish Deshmukh Threat To Oppositions
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? महायुती फुटणार, शिंदे-पवार एकत्र येणार?

दरम्यान दोन दिवसाआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांला मारहाण करण्यात आली होती. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीचे नाव पुढे आलं होतं. त्याला प्रतिउत्तर देताना आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित ही धमकी दिलीय. सद्या नागपूर जिल्ह्यत आशिष देशमुख यांच्या या भाषणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com