Senior leader Sharad Pawar seen interacting with Parth Pawar at Silver Oak residence, sparking political discussions Saam Tv
महाराष्ट्र

शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत; नातवांना आजोबांकडून राजकारणाचं धडे

Sharad Pawar Steps Into Mentor Role: अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत कसे आलेत? नव्या पिढीला शरद पवार कसं मार्गदर्शन करतायत... पाहूयात या रिपोर्टमधून..

Suprim Maskar

  • अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत

  • पार्थ पवार यांना राजकारणातील धडे देताना दिसतायत

  • सहयोग निवासस्थानातील व्हिडिओची जोरदार चर्चा

अजितदादांच्या निधनानंतर सहयोग निवासस्थानातील हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय...या व्हिडिओत पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगताना दिसतायत... तर शरद पवार मान डोलवत पार्थ यांना नकार देतायत...त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानं शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत आल्याचंच व्हिडिओतील देहबोलीतून दिसतयं...

आता हा व्हिडिओ बघा...शरद पवार आपल्या दोन्ही नातवांना बाजूला बसवून कशापद्धतीनं समजावत आहेत...तर रोहित आणि पार्थ पवार हे दोघेही एखाद्या विद्यार्थ्यांसारखं शरद पवारांचं बोलणं नीट ऐकून घेतायत... एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे पवार कुटुंबातील पुढच्या पिढीमध्ये समन्वय साधण्याचं काम खुद्द शरद पवार करत आहेत..

दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांना उमेदवारी देण्यावरून नकारात्मक भूमिका घेणाऱ्या शरद पवारांनी या दु:खाच्याक्षणी कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीय.. शरद पवारांच्या राजकारणाबद्दल कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांनी राजकारणाची प्रतिमा बाजूला ठेवत... ते एक 'आजोबा' आणि 'कुटुंबप्रमुख' म्हणून नातवांच्या पाठीशी उभे राहिलेत... 'सहयोग'मधील हा व्हिडीओ फक्त राजकारणावरच्या गप्पांचा नाही... तर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या पवार घराण्यातील नव्या पिढीचा आश्वासक चेहरा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सूर्यकुमारची अर्धशतकी ठरली गेमचेंजर! भारतानं अमेरिकेला नमवलं! टीम इंडियाची विजयी सलामी

Sunday Horoscope : आयुष्यात आवडत्या व्यक्तीची एन्ट्री होणार; ५ राशींच्या लोकांचं रविवारी नशीब पालटणार

Saam Exit Poll : ना प्रचार, ना रॅली, मतदारांचा 'अजितदादां'ना कौल, राज्यात राष्ट्रवादी तिसरा सर्वात मोठा पक्ष

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या घातपातात कुणाचा हात? संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

पवार कुटुंबालाही संशय, घात की अपघात? विमान अपघाताचा खुलासा होणार? VIDEO

SCROLL FOR NEXT