सांगली, ता. १९ सप्टेंबर
Sharad Pawar And Nitin Gadkari Same Stage: भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सांगलीमधील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सांगलीत मराठा समाज संस्थेचा कार्यक्रम पार पडणार आहे, या कार्यक्रमाला नितीन गडकरी व शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या उपस्थिती 4 ऑक्टोबर रोजी सांगलीत मराठा समाज संस्थेचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली आहे. संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावर यानिमित्ताने होणार आहे. संस्थेला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने अमृतमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाज या संंस्थेच्या कार्यक्रमामध्ये स्वागतोत्सुक म्हणून मला संधी दिली. या जिल्ह्यामध्ये ७५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही संस्था बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहिल, हा उद्देश ठेऊन काम करते. हाच उद्देश ठेऊन सर्व जाती- धर्मांच्या लोकांना या कार्यक्रमाला आम्ही बोलावत आहोत, कोणतेही राजकारण यामध्ये होणार नाही, अशा विनंत्या केल्या आहेत, असे संजय काका पाटील म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना संजय काका पाटील यांनी सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याच्या घटनेवरही महत्वाचे विधान केले. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. ती घटना महाराष्ट्राच्या, देशाच्या मनाला चटका लावणारी, वेदना देणारी घटना यानिमित्ताने झाली, असं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.