Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप? शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार? भाजपच्या दिग्गज नेत्यासोबत तातडीची बैठक

NCP SP BJP meeting reports : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने एनडीएसोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याच्या वृत्तांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar NCP NDA alliance speculation : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना बसलेल्या धक्क्यांनंतर, आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Sharadchandra Pawar) पक्षाबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या पक्षाने आगामी काळात भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' (NDA) सोबत जावे का? यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप नेत्यासोबत गुप्त बैठक?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संपूर्ण प्रक्रियेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्याची भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यासोबत महत्त्वाची बैठक झाल्याचे वृत्त आहे. या गुप्त बैठकीत दोन्ही बाजूंकडून प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

८ खासदार अन् १० आमदारांची चाचपणी

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे ८ लोकसभा खासदार आणि १० आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींच्या मनात नेमके काय सुरू आहे, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, याची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षातीलच एका अत्यंत वजनदार आणि मोठ्या नेत्याकडे देण्यात आली आहे. पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये सध्यातरी या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे.

थेट पाठिंबा की बाहेरून मदत? दोन पर्यायांवर चर्चा

भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाल्यास एनडीएला नेमकी कशी मदत करायची, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एनडीए आघाडीत अधिकृतपणे सामील होऊन सरकारमध्ये थेट सहभागी होणे. आघाडीत थेट न जाता किंवा सरकारमध्ये न बसता बाहेरून सरकारला अनुकूल भूमिका घेणे किंवा मदत करणे. या दोन तदाव्यावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगतले.

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीला बसलेल्या राजकीय धक्क्यांनंतर आता शरद पवारांच्या या संभाव्य भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला कोणती नवी कलाटणी मिळते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. अद्याप यावर पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cold drink sugar content: कोल्ड्रिंकच्या एका ग्लासात किती प्रमाणात साखर असते? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

BJP Reshuffle : अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक', एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी

Gold Rate Today: पहिल्या श्रावण सोमवारी सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा 18 -22 आणि 24 कॅरेटचे दर

Pune : पुण्यात रिलस्टारवर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रिलस्टारसह ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं

जमीन-जुमल्याचे वर्षानुवर्षांचे कोर्ट कचेरीचे वाद मिटणार! राज्य सरकारची मोठी घोषणा, १ सप्टेंबरपासून...

SCROLL FOR NEXT