श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्ता विकास लवांडे यांना धमकी दिल्याचा प्रकार घडकिस आला आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
ज्यात सुळेंनी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना संभाजी भिडे यांचे धारकरी वारंवार धमकी देत असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्याप कुठलीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी युट्युबवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी संभाजी भिडे आणि त्यांच्या धारकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी या व्हिडिओमध्ये, 'ज्याप्रकारे इस्लामच्या नावाने काही सामान्य मुस्लिम तरूणांमध्ये काही आतंकवादी संघटना किंवा तालिबानी विचार रुजवले जातात. त्याचप्रकारे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या माध्यमातून हिंदू आतंकवादी बनवण्याचा प्रयत्न भिडेंचा सुरू आहे', असे ते म्हणाले होते.
लवांडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, भिडेंच्या कार्यकर्त्यांकडून लवांडे यांना धमकीचे फोन जात होते. तसेच लवांडे यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात येत होती. त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पुणे शहर पोलिसांकडे सविस्तर पुराव्यासकट तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट
'१ मार्चला विकास लवांडे यांच्या शिंदेवाडी गावातील घराबाहेर काही २५०-३०० तरूण जमले. त्यांनी लवांडे यांच्या घरावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर गावात पोलीस बंदोबस्त मिळाला. यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही.
यानंतर धमक्या सुरूच होत्या. २१ मार्चलाही एका अज्ञात नंबरवरून, 'जय श्री राम, उद्या तुझ्या घरी येतो आणि दाखवतो' अशी धमकी विकास लवांडे यांना दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामाजिक कार्यकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणून अशा पद्धतीने झुंडशाहीने दहशत माजवू पाहणाऱ्या आणि बेकायदा कृत्य करणाऱ्या लोकांचा तात्काळ बंदोबस्त होणे आवश्यक आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.