maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांच्या आमदाराचा अजितदादांसोबत एकाच गाडीने प्रवास; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा INSIDE स्टोरी

Maharashtra Political News : शरद पवारांच्या आमदाराने आज अजित पवारांसोबत एकाच गाडीने प्रवास केला. यावेळी दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, वाचा सविस्तर

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. यादरम्यान, Jशरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीने प्रवास केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोघांच्या भेटीनंतर राजकीय अर्थ काढण्यास सुरुवात झाली. मात्र, या भेटीवर खुद्द शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊसपासून कौन्सिल हॉलपर्यंत एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी गाडीत अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील देखील होते. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. माळसिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी याआधीही अजित पवारांची भेट घेतली होती. उत्तम जानकर यांनी मंत्रालयात भेट घेतली होती. अजित पवारांच्या भेटीनंतर जानकरांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

आमदार उत्तम जानकर म्हणाले, 'अजित पवारांसोबत फक्त पाण्याच्या संदर्भात चर्चा केली. अजित पवारांशी राजकीय चर्चा नाही. तुमच्या मनात अनेक चर्चा असतात. मात्र, तालुक्यातील अनेक विकासकामे असतात. त्यामुळे मंत्र्यांची भेट घ्यावी लागते'. अजित पवारांच्या भेटीवर जानकर म्हणाले, 'मी शरद पवार गटाचा आमदार आहे. आमचे 10 लोक आमदार आहेत. एका आमदारामुळे काही फरक पडत नाही. गेलो तर राजीनामा देऊन जावं लागेल. खरंतर त्यांच्या पक्षाला गरज नाही. त्यांच्याकडे 250 आमदार आहेत. आमचे सगळे मिळून 50 आमदार आहेत. त्यामुळे गरज नसताना ते कशाला बोलावतील'.

राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाची चर्चा?

अजित पवारांचा पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांना विकासकामे आणि निधींसाठी झुकतं मिळण्याची शक्यता असते. त्यात अजित पवार हे अर्थमंत्रत्री आहे. त्यामुले अजित पवार यांच्या मदतीशिवाय आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करता येणार नाही हे सत्य आहे. या कारणामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये अनेकदा पक्षप्रवेश होताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT