Eknath Khadse vs Girish Mahajan 
महाराष्ट्र

Jalgaon Politics: गिरीश महाजन माझे पाय धरायचे; आता त्यांना जागा दाखवा, खडसेंची भाजपच्या 'संकटमोचका'वर सणसणीत टीका

Eknath Khadse vs Girish Mahajan : जामनेरमध्ये झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी भाजप प्रवेशावर मोठं विधान केलं.

Bharat Jadhav

संजय महाजन, साम प्रतिनिधी

गिरीश महाजन यांना गुरमी असून त्यांना माज आला आहे. त्यांची जागा दाखवा, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलीय. ते शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेत बोलत होते. जळगावमधील जामनेरमध्ये झालेल्या शिव स्वराज्य यात्रेत दिलीप खोडपे यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलतांना एकनाथ खडसे यांनी भाजपच्या संकटमोचकावर म्हणजेच गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजप प्रवेश विसर्जित झाला

शरद पवार गटाच्या कार्यक्रमात खडसे यांनी उपस्थिती लावल्याने आणि महाजन यांच्यावर खरमरीत टीका केल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ब्रेक लागलाय. त्यावर स्वत: खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय. आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्र जी म्हटले होते मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला आहे.

मी आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्थायी आहे. सदस्य आहे आणि यापुढेही ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं खडसे म्हणाले.

महाजनांवर खरमरीत टीका

कार्यक्रमात बोलतांना खडसे म्हणाले, पस्तीस वर्षात जामनेर मधे शकडो सभा माझ्या झाल्या, पणं अशी पहिली सभा मी पहात आहात.परिवर्तनची ही सभा आहे. बोलण्या अगोदर मी सतीश पाटील यांची परवानगी घेतली,कारण मी राष्ट्रवादी मध्ये नवखा आहे. त्यांनी श्रीराम पाटलांची माफी मागून त्यांनी यावा असं त्यांना विचारले. मी राष्ट्रवादीतच आहे. आपण या कार्यक्रमाला यावं किंवा नाही याबाबत जयंत पाटील यांना विचारणा केल्याचं खडसे म्हणाले.

सतीश अण्णा किंवा तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही, आणि सांगणार नाही,मला भाजपमध्ये या असं त्यांनी मला सांगितले होते, मी राष्ट्रवादीमध्येच होतो. या सगळ्याच्या बाबत शरद पवार आणि जयंत पाटील यांना माहीत आहे. ही धनशक्ती विरुद्ध जन शक्तीची ही लढाई आहे. ही निवडणूक आरपारची निवडणूक असून धन शक्तीविरोधातील ही निवडणूक असल्याचं खडसे म्हणाले.

यावेळी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ही निवडणूक आरपारची निवडणूक आहे. त्यावेळेस गिरीश महाजन माझे पाय धरायचे आणि सांगायचं की मला वाचवा. मी सभा घेतली त्यामुळे त्यावेळेस ते निवडून आले होते. आता गिरीश महाजन यांना आणून मी पाप केलं असं मला वाटतं. ज्याला मोठे केले, ते सद्गृहस्थ वाटले होते, त्याची अलीकडची वर्तणूक पाहिली की पाप केले असे वाटते.

या मतदारसंघात मी काम केले आहे, आज सरकार कोणाचेही असले तरी त्याचे श्रेय आपले आहे. आज मंत्री असले तरी यांनी काय केले, असा सवाल खडसे यांनी गिरीश महाजन यांना या सभेत केला. आज गावात रस्ते नाही, मुतारी बंद, ग्रामविकास मंत्री तुम्ही तुमचे लक्ष कुठे? असे प्रश्नही त्यांनी गिरीश महाजन यांना विचारलेत.

महाजन यांचा पराभव करणार

जळगावमध्ये पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा राजकीय वाद उफाळून आलाय. महाजन आणि खडसे यांच्या वादामुळे यंदाची विधानसभा चुरशीची ठरणार आहे. खडसे यांनी या सभेत खोपडे यांना पाठिंबा देत महाजन यांना चीतपट करण्याच्या चंग बांधल्याचं दिसून आले.

त्यावेळेस गिरीश महाजन माझ्या पाय धरायचे आणि सांगायचं की मला वाचवा.त्यावेळेस मी सभा घेतली, त्यामुळे त्यावेळेस ते निवडून आले होते. त्यांना आता गुरमी आलीय. त्यांना त्यांची जागा दाखवा. ज्यांना आम्ही बसवले त्यांना खालीही आम्ही बसणार आहोत, सोनिया गांधी यांची सभा बघून यांची पतली झाली होती, असा टोलाही खडसे यांनी लगावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT