ncp  Saam tv
महाराष्ट्र

पटेल-तटकरे दादांची राष्ट्रवादी फोडणार? राष्ट्रवादीतील 22 आमदार भाजपात जाणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

maharashtra politics : राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी शिवसेना फोडण्याची रणनीती आखली गेली, त्याच नव्या राजकीय बंडाची स्क्रिप्ट लिहली गेल्याची चर्चा आहे... यावेळी राज्यातील कोणता पक्ष फुटण्याची चर्चा आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

महाराष्ट्रात दोन शिवसेना झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. आता दादांच्याच राष्ट्रवादीत उभी फूट प़डणार असल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे २२ आमदार घेऊन भाजपात जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र हे सर्व आरोप तटकरेंनी फेटाळून लावले आहेत.

विशेष म्हणजे याचे संकेत ज्या ठिकाणी शिवसेना फोडण्याची रणनीती आखली गेली त्या आसामच्या कामाख्यातच मिळाले आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत गेल्या होत्या. एवढंच नव्हे तर तिघांनी सोबतच कामाख्या देवीचं दर्शनही घेतल. मात्र परतीच्या प्रवासात त्यांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडली. आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत परत आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत आल्या आल्या तटकरेंनी थेट सिल्व्हर ओक गाठलं...त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीची सूत्रं सुनेत्रा पवारांना देण्यापूर्वी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आल्यावरून प्रफुल्ल पटेल वादात सापडले होते. त्यानंतर थेट सुनेत्रा पवारांनी घटनेतले बदल गृहीत न धरण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. एवढंच नव्हे तर गेल्या महिन्यात आयोगाला पाठवलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पटेल तटकरेंच्या पक्षातील पदांचा उल्लेख नव्हता.

तर कार्यकारिणीच्या यादीतून दोघांच्या नावांचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे पटेल तटकरे कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे. आता सुनेत्रा पवार दोघांची नाराजी दूर करणार की हा संघर्ष वाढत जाऊन पटेल आणि तटकरे खरंच काही आमदारांना घेऊन भाजपच्या तंबूत दाखल होणार याचीच राजकीय विश्वात चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT