Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले, VIDEO

Sharad Pawar latest Speech : शरद पवार यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. धाराशिवातील विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी महायुतीवर तोफ डागली.

Vishal Gangurde

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिव : विधानसभा निवडणुकीत राजकीय सभांचा धुरळा उडाला आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून राजकीय सभेत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शरद पवारांनीही राज्यभरात प्रचारसंभाचा धडाका लावला आहे. परांडामध्ये शरद पवारांनी स्वत: त्यांचा वयाचा उल्लेख करत महायुतीला मोठा इशारा दिला. सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी महायुतीला इशारा दिला.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

ओमराजे, मला तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही फिरतात म्हणतात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही. आता एक म्हातारा खांद्यावर बसून आल्याला पहिला का?

संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा केली. मात्र तुम्ही लोकांनी निर्णय हाती घेतला.

तुम्ही-आम्ही एकत्र झालो. महाराष्ट्रातील 48 खासदरापैकी 31 खासदार तुम्ही निवडून दिले. तुम्ही राज्यघटना वाचवायचं काम केलं.

ही विधानसभा तुमच्या विचाराच्या लोकांच्या हातात पाहिजे. सत्ता हातात आल्यावर नागरिकांचे प्रश्न सोडवता येतात.

दुष्काळाला तोंड देणारा, रोजगार हमीच्या कामावर जाणारा तुमच्यासारखा शेतकरी ऊस उत्पादन करत आहे.

माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्या घरातील मुलं उच्चशिक्षित झाली पाहिजेत.

त्यासाठी आम्ही काम हातात घेतलं आहे. महाविकास आघाडी संघटन उभं केल आहे.

महिलांना अधिकार दिले की महिला काहीही करू शकतात. महिलांना संधी देण्यासाठी महालक्ष्मी योजना काढली.

कर्जमाफीचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतला. मात्र, आता नरेंद्र मोदी असे निर्णय घेऊ शकणार नाहीत. ते भाषण करण्यात हुशार आहेत. मात्र निर्णय घेण्यात नाहीत.

काही लोकांनी साथ सोडली आणि भाजपच्या पंक्तीत गेले. सुरुवातीला विकासासाठी सोबत गेल्याचे सांगत होते. आता भुजबळ नावाचे मंत्री आहेत. ते सांगत आहेत, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकल होतं म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. एक प्रकारे लाचारीच दर्शन घडलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत २६ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Ishan Kishan, IPL Mega Auction: काव्या मारणने डाव टाकला! मुंबईच्या विश्वासू खेळाडूला घेतलं संघात

kripalu maharaj : कृपालू महाराजांच्या मुलींच्या कारला भीषण अपघात; मोठ्या मुलीचा मृत्यू, २ जणांची प्रकृती गंभीर

IPL Mega Auction 2025 Live News: राजस्थानने संधी साधली! इंग्लंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजाला १२.५० कोटीत घेतलं संघात

SCROLL FOR NEXT