अभिजीत सोनवणे
Maharashtra Politics: सध्या पुण्यामध्ये पोटनिवडणुकांमुळे राजकीय वातावरम ढवळून निघालं आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. विरोधक देखील मैदानात उतरले आहेत. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुण्यात यावं लागतंय. अशात यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला चांगलाच चिमटा कढला आहे. ते इथे येत आहेत म्हणजे आमचं कामं चांगलं सुरू आहे, असं पवारांनी म्हटलंय. (Latest Sharad Pawar News)
" मागच्या काळात भाजपा नेत्यांचे पुण्यात वाढलेले दौरे, अमित शहांना पोट निवडणुकीसाठी पुण्यात यावं लागतंय म्हणजे आमच्या कार्यकत्यांचे काम चांगले सुरु असल्याचे लक्षण आहे, असं शरद पवार म्हणाले.
सध्या शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत भाष्य केलं. तसेच अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी चर्चा आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या बाबत म्हटलं आहे की, "अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यावरुन ज्यांची जबाबदारी आहे ते याबाबत कितपत लक्षात घेता याबाबत शंका.", असे म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी फडवणीसांवर निशाणा साधला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर देखील शरद पवार यांनी टीका केली आहे. " मुंबई मनपाची निवडणुक पाहुन मोदी महाराष्ट्रात येत आहे हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा.", असं शरद पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.