Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजाबद्दल ही नाराजी व्यक्त केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Maharashtra Political News)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय हस्तक्षेप करतात, तसेच ते राजकीय हेतूने देखील काम करतात, असा आरोप शरद पवार यांनी केल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, द्रमुक नेते टीआर बाबू, टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय आणि सुखेंदू शेखर रे, बीआरएसचे केशवा राव आणि नामा नागेश्वर राव यांच्यासह विजयसाई रेड्डी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. (Latest Marathi News)
याशिवाय बैठकीला वायएसआर काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या गटातील नेत्यांची सुद्धा उपस्थिती असल्याची माहिती आहे. बैठकीला ३७ सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. याच बैठकीत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.