महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल काँग्रेसवर जहरी टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी काल केलेलं वक्तव्य चुकीचं असंल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमधून पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी महिला आरक्षणासह, कांदा प्रश्नावर भाष्य केलं.
काँग्रेसवरील टीकेवून बोलताना शरद पवार म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल बोलताना म्हटलं की, की संसदेत महिला आरक्षण निर्णय एकमताने घेतला गेला. दोन सदस्य सोडले तर कुणीही याला विरोध केला नाही. एक सूचना होती की घटनात्मक दुरुस्ती करताना ओबीसी यांना देखील संधी द्यावी. असे असूनही पंतप्रधानांनी काँग्रेस आणि काही लोकांनी नाईलाजाने त्यांना पाठींबा दिला असं म्हटलं तर हे चुकीचं आहे."
महिला आरक्षावरून पुढे शरद पवारांनी त्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामांबद्दल बोलताना सांगितलं की, "1993 साली महाराष्ट्राची सूत्रे माझ्याकडे होती. राज्य महिला आयोग आम्ही त्यावेळी स्थापन केला. त्यावेळी स्वतंत्र महिला बालकल्याण विभाग सुरू केला. मी मुख्यमंत्री असाताना महिलांच्या संदर्भात मी निर्णय घेतले. मी संरक्षण मंत्री असताना महिलांना विभागात संधी देण्याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर आर्मी नेव्ही आणि एअर फोर्समध्ये महिलांना ११ टक्के भरतीचा निर्णय घेतला." असं शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले होते मोदी
काँग्रेस पक्ष गंज आलेल्या लोखंडासारखा आहे. तसेच त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडेये. महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला पाठिंबा हा नाविलाजामुळे आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.
१०० टक्के खोटं विधान
"शरद पवार यांच्या मान्यतेनंतरच आम्ही नागालँडमध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याचं पत्र दिलं.", प्रफुल पटेल यांच्या या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले की, "प्रफुल पटेल यांचं वक्तव्य १०० टक्के खोटं आहे. मला सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही असं मी सांगितलं होतं, असं शरद पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.