Uddhav-Raj Thackeray Alliance saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंची युती निश्चित? ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Uddhav-Raj Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीबाबत संजय राऊतांनी स्पष्ट संकेत दिलेत..मात्र आता ठाकरेंचं ठरलं असलं तरी महाविकास आघाडीचं नेमकं काय? राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सहभागी करुन घेतलं जाणार का? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यानंतर युतीच्या चर्चेला गती.

  • शरद पवारांचं मोठं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय.

  • शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीची शक्यता.

  • महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांसाठी विरोधकांची एकजूट मजबूत होण्याची चिन्हं.

हिंदीसक्तीविरोधात एकीचा नारा दिलेल्या ठाकरे बंधूंनी बेस्टच्या निवडणुकीत युतीची घोषणा केलीय. तर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर संजय राऊतांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची युती निश्चित झाल्याचे संकेत दिलेत. राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतं दुरावण्याच्या भीती काँग्रेसला आहे.. मात्र ठाकरेंसोबतच्या युतीवर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ म्हणत वेट अँट वॉचची भूमिका घेतलीय.

तर राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगत पवारांनी सकारात्मक भूमिका घेतलीय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इंडिया आघाडीला काही अडचण नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र 2017 च्या निवडणुकीत शिवसेना 84, भाजप 82, राज ठाकरे 07, काँग्रेस 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या.

आता शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंकडे 55 तर शिंदेंकडे 44 माजी नगरसेवक आहेत.. तर मनसेचा मुंबईत एकही नगरसेवक उरला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सहभागी करुन घेणार की ठाकरे बंधूंव्यतिरीक्त महाविकास आघाडीतील इतर पक्ष वेगवेगळे लढून 2019 च्या विधानसभेप्रमाणे सत्तास्थापनेसाठी निकालानंतर येणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

Organic Incense Sticks : सुगंधीत धूप विकत कशाला? घरीच ऑरगॅनिक धूपच्या कांड्या करा तयार

29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी गावागावात बैठका सुरू पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT