Maharashtra Politics: गांधींसोबत ठाकरेंची डिनर डिप्लोमसी, ठाकरे मविआतून बाहेर पडणार?

Raj Thackeray Entry Into MVA Alliance: तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत... ठाकरे बंधूंच्या युतीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा रंगलीय.
Uddhav Thackeray meets top INDIA bloc leaders in Delhi amid alliance uncertainty and Raj Thackeray’s potential entry into MVA.
Uddhav Thackeray meets top INDIA bloc leaders in Delhi amid alliance uncertainty and Raj Thackeray’s potential entry into MVA.Saam Tv
Published On

दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धडाका उडणार हे निश्चित झालंय..तर मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकीचा नारा दिलाय... त्यात काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी ठाकरेंच्या युतीला ग्रीन सिग्नल दिलाय... मात्र दिल्लीतील बैठकीनंतर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार की नाही? हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे....

राज ठाकरे मविआत?

मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि इतर पक्षांची काय भूमिका?

इंडिया आघाडीतील पक्ष राज ठाकरेंसोबतची युती स्वीकारतील का?

काँग्रेसचा विरोध झाल्यास उद्धव ठाकरे भावासाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही.. त्यातच आता राज्यातील आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणूका आणि बिहारच्या मतदार पुनर्पडताळणीच्या विषयावरुन राजकारण तापलं असताना राहुल गांधींनी इंडिया आघाडीची बैठक बोलावलीय.. मात्र याच बैठकीत राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय...मात्र राज ठाकरेंसाठी होकार दिली तर कॉंग्रेसची कशी कोंडी होऊ शकते

ठाकरेंच्या युतीमुळे काँग्रेसची कोंडी?

राज ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे उत्तर भारतीय मतं दुरावण्याची भीती

आक्रमक हिंदूत्ववादामुळे पालिका निवडणुकीत मुस्लीम मतं दुरावण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या खळ्ळखट्याकला काँग्रेसचा विरोध

मात्र ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याचा दावा संजय राऊतांनी फेटाळून लावलाय...खासदारांसोबत बैठक, राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत.. मात्र इंडिया आघाडीच्या नेत्यांना राज ठाकरेंना सोबत घेण्याचं महत्व पटवून देणार की एकमत न झाल्यास थेट भावासाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com