शरद पवार-नितीन गडकरी साम टीव्ही
महाराष्ट्र

शरद पवार-नितीन गडकरी नगरमध्ये येणार एकाच व्यासपीठावर

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात नगर-करमाळा रस्ता कामासाठी अहमहमिका लागली आहे. हे काम आपल्याच प्रयत्नांनी होत आहे, असा दावा दोघांकडूनही केला जात आहे. विशेष म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.Sharad Pawar and Nitin Gadkari will come together

उभयतांच्या उपस्थितीत शनिवारी (दोन ऑक्टोबर) रस्ताकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी नगरला येत आहेत. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ते एकाच व्यासपीठावर असतील. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप नेते बऱ्याच कार्यक्रमात एकत्र येत असतात. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजी-माजी आणि भावी असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. आता राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते एकत्र येत असल्याने तर्क लढविण्यास सुरूवात झाली आहे.

गडकरी यांच्या पुढाकाराने रस्त्यांची कामे होत आहेत, अशी माहिती भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा भय्या गंधे यांनी दिली. यावेळी सुनील रामदासी, सचिन पारखी उपस्थित होते. नगर जिल्ह्यात पवार व गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत.

नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी १२०० कोटी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे. या कामांचे भूमिपूजन होणार आहे.

अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

SCROLL FOR NEXT