kolhapur news  Saam tv
महाराष्ट्र

शिवजयंतीच्या कार्यक्रमात तरूणांचा धिंगाणा; छत्रपतींच्या कोल्हापुरात तरूणाईचा लाजिरवाणा प्रकार, VIDEO

kolhapur news : राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. मात्र महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या कोल्हापुरात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. इथं तरूणांनी अक्षरश; धिंगाणा घातला होता. घडलेला प्रकार महाराष्ट्राला लाज आणणारा आहे. पाहूयात शिवजयंतीच्या दिवशी कोल्हापुरात नेमकं काय घडलं

Saam Tv

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या कोल्हापूर नगरीतला हा किळसवाणा प्रकार...तेही घडलाय शिवजयंतीच्याच दिवशी...गुरूवारी संपूर्ण राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता. मात्र पन्हाळगडावरून ज्योत घेऊन येत असताना अतिउत्साही तरूणांची अशी हुल्लडबाजी सुरू होती. त्यांनी 60 ते 70 दुचाकींचे सायलेन्सर काढले आणि कर्णकर्कश आवाज काढत अक्षरश: धिंगाणा घातला.

एव्हढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांनी एक बाईक पंचगंगा नदीत फेकून दिली, काहींनी एक बाईक जाळून टाकली. खानाच्या फौजासारखा धुमाकूळ घालणाऱ्या या टोळक्यानं भुदरगड, कसबा सांगावं इथं तर कहरच केला. त्यांनी एका तरूणावर हल्लाही केला. आता तरूणांच्या या सैतानी कृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमांचं प्रतिक...मात्र महाराजांच्या पराक्रमाची पताका जिथं डौलानं फडकते त्याच कोल्हापुरात तरूणाईनं घातलेला धिंगाणा साऱ्या महाराष्ट्राला लाज आणणारा आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांचा माज उतरवण्याची गरज आहे, तीच खऱ्या अर्थानं शिवजयंती असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: दाट आणि काळ्या केसांसाठी या फुलाचा करा असा वापर

New Labour Law: ३० लाखांचा CTC असेल तर इन हँड सॅलरी किती होणार? एप्रिलपासून किती कमी पगार येणार? वाचा सविस्तर

Post lunch dip: दुपारच्या जेवणानंतर लगेच सुस्ती का येते?

Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ

Mrunal Thakur Photos: 'धुळ्याची हिरोईन', मृणाल ठाकूरचे हे 5 फोटो पाहून काळजाचा ठोका चुकेल

SCROLL FOR NEXT