Shruti Vilas Kadam
जास्वंदाची फुलं आणि पानं वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा.
नारळाच्या तेलात जास्वंदाची फुलं उकळून घरगुती हेअर ऑइल तयार करा. हे केसांना पोषण देते.
जास्वंद पेस्टमध्ये दही किंवा मेथी घालून मास्क तयार करा. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
नियमित वापर केल्यास केस गळणं कमी होतं आणि नवीन केसांची वाढ होते.
जास्वंदातील नैसर्गिक गुणधर्म स्काल्प स्वच्छ ठेवतात आणि कोंडा कमी करतात.
जास्वंदाचा वापर केल्याने केस नैसर्गिकरित्या काळे आणि घनदाट दिसतात.
चांगले परिणाम मिळवण्यासाठी जास्वंदाचा वापर आठवड्यातून किमान दोनदा करा.