Surabhi Jayashree Jagdish
दुपारचे जेवण केल्यानंतर अनेकांना अचानक झोप येते किंवा आळस जाणवतो. यालाच सामान्यतः पोस्ट-लंच डिप असं म्हटलं जातं. ही शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
जेवणानंतर शरीर आपली ऊर्जा पचनासाठी वापरू लागतं. ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी प्रत्येकामध्ये घडते. म्हणूनच जेवणानंतर थोडी सुस्ती जाणवणे स्वाभाविक आहे.
जेवण केल्यानंतर रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे जास्त प्रमाणात वळतो. यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह थोडासा कमी होतो. त्यामुळे थकवा आणि झोप येण्याची भावना निर्माण होते.
मेंदूकडे कमी रक्तपुरवठा झाल्याने लक्ष केंद्रित करणे कठीण होते. डोळे जड वाटू लागतात आणि शरीर शांत होऊ लागतं. यामुळे काम करण्याची ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटते.
जास्त कार्बोहायड्रेट असलेलं किंवा तेलकट-जड अन्न खाल्ल्यास झोप अधिक येते. अशा अन्नामुळे शरीराला पचनासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सुस्ती अधिक तीव्रतेने जाणवते.
जेवणानंतर शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढतं. यामुळे ट्रिप्टोफॅन एक्टिव्ह होतं आणि त्यापासून सेरोटोनिन व मेलाटोनिन तयार होतात. हे दोन्ही हार्मोन्स झोप येण्यास कारणीभूत ठरतात.
हलका आणि संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीन, फायबर आणि कमी कार्बोहायड्रेट यांचा समतोल राखावा. यामुळे दुपारनंतर येणारी झोप आणि आळस कमी होऊ शकतो.