Patan APMC Election Result , Shambhuraj Desai , Vikramsinh Patankar,
Patan APMC Election Result , Shambhuraj Desai , Vikramsinh Patankar,  saam tv
महाराष्ट्र

Patan APMC Election Results : राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यास एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचा झटका; 45 वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिरकाव (पाहा व्हिडिओ)

ओंकार कदम

Patan Krushi Utpanna Bazar Samiti Result : मागील दहा वर्षात माझ्या आमदारकीच्या माध्यमातून विकास सुरू आहे. यामुळेच हे परिवर्तन झालं आहे. जनमताचा कौल मी नम्रपणाने स्वीकारतो. जो वचननामा पुढील पाच वर्षासाठी दिला आहे तो पूर्ण करण्यासाठी उद्यापासूनच आम्ही कामाला लागतोय अशी प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण बाजार समितीच्या निकालानंतर (Patan Market Committee Election Result) व्यक्त केली. (Maharashtra News)

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने 18 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर यांच्या एकहाती सत्तेला पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या गटाने सुरुंग लावला.

या विजयानंतर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले तब्बल 45 वर्षानंतर सत्तांतर घडवण्यात आम्हांला यश आले आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून परिवर्तन घडविल्याने मी जनमताचा कौल नम्रपणाने स्वीकारतो. नवीन संचालक मंडळ वचननामा पुर्ण करण्यासाठी आम्ही उद्यापासूनच कामाला लागू असेही देसाईंनी नमूद केले.

आगामी निवडणुक आम्ही महायुतीतून जिंकू

अमित शहा यांच्यासोबत नेहमीच मुख्यमंत्र्यांच्या बैठका होत असतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे या सरकारने काम केलं आहे याची दखल केंद्रीय नेतृत्वाने केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजनांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. 2024 मध्ये महायुतीतून आम्ही निवडणूक जिंकू याच उद्देशाने ही बैठक झाली असावी. तरीदेखील ही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही असेही मंत्री देसाईंनी नमूद केले.

महाविकास आघाडीत बिघाडी दिसेल

महाविकास आघाडीची शेवटची सभा यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मुद्द्यावर शंभूराज देसाई यांनी दोन तीन मुख्यमंत्री पदाचे बॅनर राष्ट्रवादीत लागले असल्याचे वक्तव्य करून अजून महाविकास आघाडी निवडणूक लढवायची आहे. तरीदेखील असे बॅनर लागत आहेत. आम्ही सुद्धा विकास कामांचा सपाटा लावला आहे. 2024 च्या निवडणुकीत 200 प्लसचे टार्गेट पूर्ण करणार यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी नक्कीच दिसून येईल.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

Health Tips: जेवणानंतर तुम्हालाही आहे का चहा पिण्याची सवय? त्याआधी हे वाचाच

Relationship Tips : तुम्हीही लग्नासाठी उतावळे झालात; कमी वयात विवाह करण्याचे तोटे माहितीयेत का?

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

SCROLL FOR NEXT