Kolhapur Sharad Krushi Pradarshan Saam Tv
महाराष्ट्र

Krushi Pradarshan: शरद कृषी प्रदर्शनाचं कोल्हापूरमध्ये थाटात उद्घाटन; भारतातील सर्वात मोठ्या बैलानं सर्वांचं लक्ष वेधलं

Kolhapur Sharad Krushi Pradarshan: कोल्हापूरमध्ये राज्याचे शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शरद कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी भारतातील सर्वात मोठ्या बैलानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Biggest Bull In Kolhapur Sharad Krushi Pradarshan

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातल्या जयसिंगपूर येथे सातव्या शरद कृषी राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. अगदी थाटामाटात प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या उद्घाटनाला हजेरी लावली होती. (Latest Marathi News)

जयसिंगपूरच्या पंचक्रोशीतील नागरिकांना याचा लाभ मिळावा, यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून शरद कृषी (Kolhapur Sharad Krushi Pradarshan) प्रदर्शन साकारण्यात आलं आहे. दरम्यान या शरद कृषी प्रदर्शनात देशातील सर्वात मोठ्या बैलाने सर्व उपस्थितांचं लक्ष वेधलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना मार्गदर्शक

शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने सध्या राज्यभरात कृषी प्रदर्शनाचं आयोजन (Kolhapur Agriculture Exhibition) मोठ्या प्रमाणावर करण्यात येतंय. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं, त्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावं, या उद्देशाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोल्हापुर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथं सातवं शरद कृषी राज्यस्तरीय आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.

या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. अनेक नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्वात मोठा बैल

देशातील सर्वात मोठा बैल, हे या शरद कृषी प्रदर्शनाचं (Agriculture Exhibition) खास आकर्षण ठरलं आहे. या बैलाचं नाव राजा आहे. त्याचं वजन 1.5 टन आहे. तर उंची 5 फूट 9 इंच असून लांबी 10 फूट आहे. तो 35 टन वजनाचा ट्रक ओढणारा भारतातील सर्वात मोठा बैल ठरला आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील खंडेराजुरी या गावचे वसंत मारुती चव्हाण या शेतकऱ्यांने अगदी लहान मुलाप्रमाणे या बैलाचं संगोपन केलं आहे. राजा बैल त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.

दरम्यान शिरोळ तालुक्यातील उत्पादित होणारा भाजीपाला हा देशातील मोठमोठ्या बाजारपेठेत जातो. अनेक संकटांना तोंड देत शेतकरी नवनवीन प्रगती करत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना या नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्की फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT