Agriculture Export : देशातील कृषी क्षेत्र करणार विक्रम; २०३०पर्यंत निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर पोहोचणार

Agriculture sector: देशातून कृषी उत्पादने आणि सेवांची निर्यात वेगाने वाढत आहे. येत्या ६ वर्षात म्हणजे २०३० पर्यंत हा आकडा १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृषी निर्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले.
 Agriculture secto
Agriculture sectoSaam Tv
Published On

Agri Products and Services:

भारतातील कृषी निर्यात क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. देशातील कृषी निर्यात २०३० पर्यंत दुप्पट होऊन १०० अब्ज डॉलर होणार असल्याची अपेक्षा केंद्राने वर्तवलीय. सध्या भारताची कृषी निर्यात ५० अब्ज डॉलर्सची आहे. भारताने २०३० पर्यंत वस्तू आणि सेवांची निर्यात २ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिली.(Latest News)

देशातून कृषी उत्पादने आणि सेवांची निर्यात वेगाने वाढत आहे. येत्या ६ वर्षात म्हणजे २०३० पर्यंत हा आकडा १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृषी निर्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं सुनील बर्थवाल म्हणाले. ते ‘इंडस फूड फेअर-२०२४’मेळाव्यात बोलत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुनील बर्थवाल यांनी दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फूड अँड बेव्हरेज शो इंडस फूड २०२४ मध्ये हजेरी लावली होती. भारतातील रेडी टू फूड सेगमेंटमध्ये प्रगतीला मोठा वाव आहे. भारतीय उत्पादने आणि सेवा हव्या असलेल्या देशांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्यांनी काम करावं, असं ते म्हणाले. दम्यान या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, चालू आर्थिक वर्षात देशाची कृषी निर्यात ५३ अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचेल. तांदूळ, गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी असली तरी निर्यातीत कोणतीही घट होणार नाही अशी अपेक्षा आहे.

 Agriculture secto
Modi Govt Schemes: मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे योजना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com