Ajantha-Ellora Film Festival: अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा; जगभरातील ५५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन

Film Festival: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली आहे. हा महोत्सव ३ जानेवारी ते ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
Ajantha-Ellora Film Festival
Ajantha-Ellora Film FestivalGoogle
Published On

Ajantha-Ellora Film Festival

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली आहे. हा महोत्सव ३ जानेवारी ते ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत आहे.

आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट छत्रपती संभाजीनगरच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत हा या महोत्सवाचा उद्देष आहे. चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व तरुण पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून देण्यासाठी हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा :

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश आहे. पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक धृतीमान चॅटर्जी (कोलकाता) हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी) हे मान्यवर असणार आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून कान चित्रपट महोत्सवाची यावर्षीची सर्वोत्कृष्ट फिल्म अनॉटामी ऑफ फॉल (फ्रेंच) दाखविण्यात येणार आहे.

Ajantha-Ellora Film Festival
Aishwarya Rai: ऐश्वर्या रायने सोडलं पती अभिषेक बच्चनचं घर? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा :

महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख २५,००० रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून कान चित्रपट महोत्सवाची यावर्षीची सर्वोत्कृष्ट फिल्म अनॉटामी ऑफ फॉल (फ्रेंच) दाखविण्यात येणार आहे.

Ajantha-Ellora Film Festival
Prakash Raj News: अभिनेते प्रकाश राज यांना मोठा दिलासा; कथित पॉन्झी स्कीम घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चीट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com